लेखक डी.सी. पांडे यांच्यातर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप

लेखक डी.सी. पांडे यांच्यातर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप

पुणे : कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने सर्व जनजीवन विस्कळित झाले आहे. अशा परिस्थित गोरगरिबांची उपासमार होऊ नये, यासाठी लेखक व प्राध्यापक डी. सी. पांडे सर यांनी पुढाकार घेत वाघोली व खराडी परिसरात गरजूंना अन्नधान्य वाटप केले.

खराडी पोलिस ठाण्याच्या मार्फत खराडी लेबरकॅम्प व दर्गा परिसरात अन्न धान्य वाटप करण्यात आले. तसेच वाघोली पोलिस ठाण्याच्या मार्फत गरीब व गरजू नागरिकांना अन्न धान्य वाटप केले.

लेखक डी.सी. पांडे यांच्यातर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप

त्यावेळी खराडी पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी तापरे व विश्वास पाटील, वाघोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक नितीन अटकरे, डी.सी.पांडे सर, डॉ. सरीता पांडे, सामाजिक कार्यकर्ते दिपक चखाले, प्रविण दिवटे व सागर गायकवाड आदी उपस्थित होते.

दरम्यान, डी.सी.पांडे हे प्रसिद्ध लेखक असून त्यांच्या आयआयटी जेईई आणि एनईईटी परीक्षेसाठी 13 पेक्षा जास्त भौतिकशास्त्र पुस्तकांचे मेरठच्या अरिहंत पब्लिकेशनमधून प्रकाशन झाले आहे.