कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी संजय मरकड यांची निवड

कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी संजय मरकड यांची निवड

पिंपरी : चिंचवड विधानसभा विद्युत वितरण समितीचे अध्यक्ष व आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांचे कट्टर समर्थक संजय मरकड यांची कानिफनाथ मढी देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्याबद्दल आमदार लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परिवाराच्या वतीने यांचा सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन स्वीकृत नगरसेवक गोपाळ माळेकर, संदीप गाडे, संजय गांधी योजना समितीचे अध्यक्ष नरेंद्र माने, सांगवी काळेवाडी मंडलाचे कार्याध्यक्ष माधव मनोरे, सांगवी काळेवाडी मंडलाचे सरचिटणीस दीपक जाधव, उद्योजक विजय कांबळे उपस्थित होते.

Actions

Selected media actions