
काळेवाडी : येथील जयवंताबाई नामदेव खेडकर (वय ८७) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात चार सुना, तीन मुली, दिर, नातवंडे, परतंडे असा परिवार आहे.
सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग खेडकर, शांताराम खेडकर, चंद्रकांत खेडकर तसेच संत शिरोमणी सावता महाराज प्रतिष्ठान काळेवाडीचे अध्यक्ष सुखदेव आप्पा खेडकर यांच्या त्या मातोश्री होत.