गाडगेबाबा म्हणजे एक चालती-बोलती पाठशाळा होते

गाडगेबाबा म्हणजे एक चालती-बोलती पाठशाळा होते

पिंपरी : गाडगेबाबा हे संता मधील सुधारक आणि सुधारकां मधील संत होते. त्यांच कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील अनेक रूढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छतेची शिकवण गाडगेबाबा देत. गाडगेबाबा म्हणजे एक चालती-बोलती पाठशाळा होती. असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांनी व्यक्त केले.

कामगार संघटना संयुक्त कृती समिती, जन आंदोलनांची संघर्ष समिती, अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती व सर्व पक्षीय व समविचारी संघटनेच्या वतीने राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यावेळी कांबळे बोलत होते.

“महापुरुषांचे विचार हे मानवी मनाला प्रेरणा देत असतात. प्रत्येक महापुरुषांचे विचार आज स्वत:मध्ये उतरविण्याची गरज आहे. राष्ट्रसंत गाडगेबाबा यांनी समाजसेवेसाठी आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत केलं. शिक्षण आणि स्वच्छतेचे महत्व गाडगेबाबांनी समाजाला पटवून दिले.” असे प्रतिपादन विरोध पक्षनेते नगरसेवक कैलास कदम यांनी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अभिवादन सभेत केले.

डॉ. बेरी यांनी आपल्या मनोगतामध्ये हे अधोरेखित केले की, आज जर राष्ट्रसंत गाडगेबाबा असते तर नक्कीच ते दिल्लीला शेतकरी आंदोलनात सहभागी झाले असते कारण बाबांनी नेहमी शेतकरी,कामगार,होतकरू दिनदुबळ्या समाजासाठी कार्य केले आहे.

आनंदा कुदळे, सुरेश गायकवाड, माजी नगरसेवक मारुती भापकर, कॉम्रेड गणेश दराडे, संतोष गोठावले, ज्ञानेश्वर मुळे, छाया देसले, काशिनाथ नखाते, नीरज कडू, सतीश काळे, धनाजी येळकर पाटील, रफिक कुरेशी, नितिन बनसोडे, विशाल जाधव, प्रताप गुरव, अशोक मिरगे, सतिष काळे, अपना वतनचे सिद्दीक शेख उपस्थित होते

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल जाधव यांनी केले, तर सूत्रसंचालन गिरीश वाघमारे व आभार संतोष गोठावले यांनी मानले.

Actions

Selected media actions