पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया सुरु | दहावीच्या गुणपत्रिकेशिवाय भरता येणार प्रवेश अर्ज

पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया सुरु | दहावीच्या गुणपत्रिकेशिवाय भरता येणार प्रवेश अर्ज

पिंपरी चिंचवड : काळेवाडीतील मराठवाडा मित्र मंडळाचे पॉलिटेक्निक येथे शैक्षणिक सत्र 2021-22 करिता प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेशसाठी सुविधा केंद्र (FC 6449) कार्यान्वित करण्यात आले आहे.

पॉलिटेक्निकला प्रवेश अर्ज भरण्याकरिता विद्यार्थ्यांना आता दहावीच्या गुणपत्रिकेची वाट पाहावी लागणार नाही. प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया दि. 30 जून 2021 पासून संस्थेत सुरुवात करण्यात आली आहे.

पॉलीटेक्नीकच्या प्रथम वर्षात प्रवेश घेऊ इच्छीणाऱ्या इयत्ता दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी संस्थेत कार्यान्वित करण्यात आलेल्या सुविधा केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्या गीता जोशी यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरण्याकरिता केवळ दहावीच्या परीक्षेचा आसन क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. वर्ष 2021 च्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल घोषित झाल्यानंतर सदर विद्यार्थ्यांचे मार्क्स एस.एस.सी. बोर्डकडून अधिग्रहित (फेच) करण्याची सुविधा उपलब्ध असेल, असे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ.अभय वाघ यांनी एका पत्राव्दारे कळविले आहे.

पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया सुरु | दहावीच्या गुणपत्रिकेशिवाय भरता येणार प्रवेश अर्ज

यावर्षी कोव्हीड-19 च्या पार्श्वभूमीवर पॉलिटेक्निकच्या प्रवेश प्रक्रियेची जवळपास सर्वच कामे ऑनलाइन पद्धतीने केली जाणार आहे.

विद्यार्थ्याना प्रवेश अर्ज दोन प्रकारे भरता येईल.

ई-स्क्रुटिनी : ई- स्क्रुटिनी या प्रक्रियेत उमेदवाराला स्वतःचा स्मार्ट फोन, लॅपटॉप किंवा संगणक वापरुन प्रवेश अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची प्रक्रिया पूर्ण करता येईल. त्यानंतर अर्ज तपासणी व अर्ज निश्चितीची प्रक्रिया (कॅन्फर्मेशन) ऑनलाइन पद्धतीने स्वतः विद्यार्थ्याला पूर्ण करता येईल.

फिजिकल स्क्रुटिनी :
फिजिकल स्क्रुटिनी या प्रक्रियेत उमेदवाराला सुविधा केंद्रात प्रत्यक्ष जाऊन प्रवेश अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची प्रक्रिया पूर्ण करता येईल. व प्रवेश अर्ज निश्चितीची प्रक्रिया (कॅन्फर्मेशन) पूर्ण करता येईल.

संस्थेमध्ये
• ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग
• मेकॅनिकल इंजिनीअरींग
• कम्प्युटर इंजिनिअरिंग
• इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग
• मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग

असे पाच अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

पॉलिटेक्निकला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यानी मराठवाडा मित्र मंडळाचे पॉलीटेक्निक, काळेवाडी पुणे, येथे कार्यान्वित केलेल्या सुविधा केंद्राचा (FC6449) प्रवेश अर्ज भरण्याकरिता व अर्ज निश्चिती करिता लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या प्राचार्यानी केले आहे.

कोव्हीड-19 च्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यासाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन मार्गदर्शनाकरिता विद्यार्थ्यांनी डॉ. पाटील सर – 7666405304
डॉ. लाखे मॅडम – 9860296729 , अथवा,
प्रा. घोगरे सर – 9850203974
वर संपर्क साधावा.

www.mmpolytechnic.edu.in

DTE Link : https://poly21.dtemaharashtra.gov.in/diploma21/