राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त थेरगावात रक्तदान शिबीर

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त थेरगावात रक्तदान शिबीर

पिंपरी चिंचवड : राज्यमंत्री बच्चु कडू यांच्या वाढदिवसनिमित्त थेरगावात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबीरात 30 युनिट रक्त जमा करण्यात आले. आदित्य बिर्ला रक्तपेढीचे डाॅ. महेश जाधव यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते संजय गायखे यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

त्यावेळी नगरसेवक कैलास बारणे, नयन पुजारी, हरेश तापकीर, सुरेश बारणे, स्विकृत सदस्य संदीप गाडे, विशाल बारणे, पत्रकार मंगेश सोनटक्के, बालाजी पांचाळ, अनिता पांचाळ, गणेश आहेर, प्रदिप दळवी, दत्ता गिरी, रवी महाडीक, विजय काळे, भारती कदम, संजय इंगळे, सागर तुपे, गोरख कोकणे, मच्छिंद्र वाळुंजकर, रवी कुदळे, नरेंद्र सोनवणे आदी उपस्थित होते.

संजय गायखे म्हणाले की, “रक्तांची अतिशय तीव्र टंचाई आहे. तरी पण अशा अडचणीच्या काळात आम्ही नेहमी तत्पर असतो. आमची रक्तदानाची लढाई प्रत्येक रुग्णांला रक्त मिळेपर्यत अशीच अखंडपणे सुरु ठेवणार आहे. आता वेळ पडली तर प्रत्येक महिण्याला रक्तदान शिबीर आयोजित करण्याचा प्रयत्न करणार आहे.”