काळेवाडी : साई मल्हार सोशल फाउंडेशन, व्यंकटेश्वरा मित्र मंडळ, ओम साई ग्रुप व जाधव हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत तापकीर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. काळेवाडी-तापकीर नगरमधील साई मल्हार मेडिकल शेजारी, तापकीर चौक येथे शनिवारी (ता. ४ सप्टेंबर) सकाळी १० ते ४ या वेळेत हे शिबिर पार पडणार आहे.
करोनाच्या काळामध्ये नागरिकांना अनेक आरोग्य विषयक समस्या भेडसावत आहेत. नागरिक आरोग्य विषयक समस्याकडे दुर्लक्ष करतात, आजाराचे वेळीच निदान न झाल्याने पुढे गंभीर परिस्थिती उदभवू शकते, नागरिकांची ही अडचण ओळखून सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत तापकीर यांच्या वाढदिवसानिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या तपासण्या होणार
ई.जी.सी., रक्तातील साखरेचे प्रमाण, हाडांची ठिसूळता, शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण, रक्त दाब तपासणी, व बॉडी मास इंडेक्स यांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. तसेच लहान मुलांचे प्रसिद्ध डॉक्टर निनाद महाले (M.D, M.B.B.S, D.C.H) यांच्या दवाखान्याचे उदघाटनही होणार आहे.
महाराष्ट्रात जाणवत असलेली रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी निरोगी नागरिकांनी सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान करावे.
दरम्यान, काळेवाडी, तापकीरनगर, श्रीनगर, रहाटणी परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी सदर आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा. असे आवाहन साई मल्हार सोशल फाउंडेशन, व्यंकटेश्वरा मित्र मंडळ, ओम साई ग्रुप, जाधव हॉस्पिटल यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.