हिंजवडी : उन्नती सोशल फाउंडेशनने कोविड-19 महामारीच्या काळात केलेल्या उल्लेखनीय कामाची पावती म्हणून फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा संजय भिसे यांचा राज्यपालांच्या हस्ते ‘महाराष्ट्र कोविड योध्दा’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यानिमित्त लोकमैत्रि परिवारातर्फे उन्नती फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे यांचा सन्मान केला.
मारूंजी येथील लोकमैत्रि परिवाराच्या संकुलात झालेल्या कार्यक्रमात लोकमैत्रि परिवाराचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. शिवाजीराव बुचडे यांच्या हस्ते संजय भिसे यांचा सत्कार झाला. त्यावेळी विलास काटे, रामदास मदने, तात्या शिनगारे, युवा उद्योजक अनिल पवार, सह्याद्री स्काऊट गाईडचे युनिट लीडर बिपीन देशमुख, सनफ्लावर पब्लिक स्कुलचे मुख्याध्यापक सदाशिव धांडे, यश टुटोरिअलचे प्रमुख डी. एम. चव्हाण आदी उपस्थित होते.
दरम्यान, पाच वर्षांपूर्वी उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने लोकमैत्रि परिवाराच्या आवारात १०० झाडे लावण्यात आली होती. ही झाडे आता बहरली असून या झाडांची संजय भिसे यांनी पहाणी करून समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तात्या शिनगारे यांनी केले तर डॉ. शिवाजीराव बुचडे यांनी आभार मानले.
- ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालयाने लावली महापुरुषांच्या प्रतिमेला “आचारसंहीता”
- Tamil Nadu Floods : बंगालच्या उपसागरावरील दबावामुळे तामिळनाडूत मुसळधार पाऊस
- KARJAT : कर्जतमध्ये वाय.के. हॉटेलचे उद्घाटन
- ‘लाडकी बहीण योजने’साठी पुन्हा मुदतवाढ; आता या तारखेपर्यंत अर्ज करता येणार…
- PIMPRI CHINCHWAD : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न ; ०५ जणांना अटक