पालघर : नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्रच्या पालघर जिल्हा कार्यकारीणी पालघरचे समन्वयक ज्येष्ठ पत्रकार दीपक मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्य कोषाध्यक्ष वैशाली आहेर यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आली. या कार्यकारिणीचा कार्यकाळ एक वर्षाचा असून ती पुढीलप्रमाणे.
अध्यक्ष – चंद्रकांत खुताडे (डहाणु, दै. पुढारी), सचिव – अनिल पाटील (वाडा, शब्द प्रहार), कोषाध्यक्ष – नीता चौरे (बोईसर, दै.नवराष्ट्र, NTV मराठी) उपाध्यक्ष – विजय देसाई (वसई)
समन्वयक – दीपक मोहिते (विरार, नवशक्ति)
कार्यकारिणी सदस्य
रुतिका वेंर्गुलेकर (विरार, लोकमत)
दिलीप कवेरीया (विरार)
रफिक घाची (डहाणु, डहाणु मिञ)
सल्लागार – उमाकांत वाघ (विरार, दै.सामना)
एनयुजे महाराष्ट्र ही एनयुजे इंडिया, नवी दिल्लीच्या सर्वात मोठ्या लढाऊ युनियनशी संलग्न असून, ब्रुसेल्सच्या इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ जर्नालिस्टसचा सदस्य आहे. जी १२१ देशात कार्यरत आहे. येत्या काळात पालघर जिल्ह्यातील एक सक्षम संघटना म्हणून जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खुताडें व सचिव अनिल पाटील यांचे नेतृत्वाखाली उत्तम काम करेल, असा विश्वास एनयुजे महाराष्ट्र अध्यक्ष शीतल करदेकर यांनी व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
पत्रकारांच्या सन्मानासाठी पालघर जिल्ह्यातही काम जोमाने होईल असा विश्वास एनयुजे महाराष्ट्र सरचिटणीस सीमा भोईर यांनी व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. तसेच एनयुजे महाराष्ट्र मार्गदर्शक व एनयुजे इंडिया उपाध्याय शिवेंद्रकुमार यांनी नवीन जिल्हा समितीला शुभेच्छा देताना अभिनंदनही केले.