एस. एम. जोशी महाविद्यालयातील सुशांत खवळे आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत द्वितीय

एस. एम. जोशी महाविद्यालयातील सुशांत खवळे आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत द्वितीय

हडपसर (प्रतिनिधी) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे आयोजित आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेमध्ये एस. एम. जोशी महाविद्यालयातील सुशांत खवळे या खेळाडूने ७४ किलो वजनी गटामधून द्वितीय क्रमांक मिळवला.

तसेच विभागीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे साहेब यांनी त्याचे अभिनंदन करीत त्याला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. त्याच्या या यशामध्ये महाविद्यालयाच्या प्राचार्यांबरोबरच शारीरिक शिक्षण संचालक प्रा. दत्ता वसावे, उपप्राचार्य डॉ. संजय जगताप, उपप्राचार्य डॉ. जडे, आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. किशोर काकडे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक आणि प्रशासकीय सेवक यांचे मोलाचे योगदान आहे.

Actions

Selected media actions