कर्जत, दि. ६ (प्रतिनिधी) : कर्जत नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रमाच्या आजच्या सहाव्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करताना २२ उमेदवारांकडून २९ अर्ज दाखल करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी दिली.
दि.६ डिसेंबर रोजी कर्जत नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याच्या सहाव्या दिवशी एकदम २९उमेदवारी अर्ज दाखल झालेआहे. गेले पाच दिवस अर्ज दाखल करण्याची मुदत असतानादेखील कोणीही अर्ज दाखल न केल्याने अर्ज माहिती निरंक राहिली दि. ७ रोजी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने दि.६ रोजी अनेक इच्छुकांची भाऊगर्दी झाली. अनेक इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरताना, अनेक कागदपत्रे गोळा करताना दमछाक झाल्याचे चित्र पाहायला मिळत होते.
प्रशासनाच्या वतीने सर्व मार्गदर्शक सूचनांची वेळोवेळी सूचना केली जात होती. आज दाखल झालेले अर्ज पैकी भारतीय जनता पार्टीच्या वतीने१८ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. शिवसेनेच्या वतीने १ तर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने १ अर्ज दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मात्र आजपर्यंत एकही अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात आघाडीबाबत अनेक चर्चेच्या फैरी झडत असल्याची तिन्ही पक्षाच्या मुख्य पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. परंतु अद्याप कोणताही निर्णय न झाल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते आहे.सोमवारी भारतीय जनता पार्टी पार्टीचे उमेदवारांनी शहरात शक्तिप्रदर्शन करत आपल्या इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल केले. उद्या दि.७रोजीअर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने इच्छुकांची भाऊगर्दी वाढून प्रशासकीय यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दि.६रोजी दाखल अर्ज खालील प्रमाणे:-
२२ व्यक्तींनी २९ अर्ज, दाखल केले आहेत
प्रभाग १ – संध्या दीपक मांडगे,
प्रभाग २ – नीता आजिनाथ कचरे- २ अर्ज,
पूजा अनिल कचरे २ अर्ज,
प्रभाग – ३ माधुरी समीर ढेरे,
रतन रावसाहेब खराडे,
प्रभाग ४ – अश्विनी सोमनाथ गायकवाड २ अर्ज,
सोनाली विनोद दळवी,
अश्विनी पांडुरंग क्षीरसागर,
प्रभाग ६ – मोनाली ओंकार तोटे २, गणेश नवनाथ क्षीरसागर,
प्रभाग ७ – अक्षय शरद तोरडमल,
प्रभाग ८ – बबनराव सदाशिव लाडाणे,
प्रभाग १० – कांचन राजेंद्र खेत्रे,
मोनिका अनिल गदादे,
प्रभाग १४- शिबा तारेक सय्यद,
रत्नमाला प्रभाकर साळुंखे २ अर्ज,
बागवान नजमा अब्बास २ अर्ज,
प्रभाग १६ – सुवर्णा विशाल काकडे,
प्रभाग १७ – अनिल मारुती गदादे, धनंजय दादासाहेब आगम,गोकुळ बापू शिंदे,अंकुश तात्याबा दळवी २ अर्ज,यात काहींनी पक्षाचे तर काहींनी अपक्ष अर्ज सादर केले.