हिंजवडी : ‘लोकमित्र जेष्ठ नागरिक संघ, मारुंजी’ या नोंदणीकृत संस्थेच्या नाम फलकाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य शंकरभाऊ मांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. रविवारी (ता. १९ डिसेंबर) मारूंजी येथील बुचडे वस्ती येथे मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बाबुराव बुचडे होते. त्यावेळी मारुंजी गावचे सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, पोलीस पाटील, जिल्हा परिषद सदस्य, गावचे ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थेचे संस्थापक ॲड. सुभाष जौंजाळे यांनी प्रास्ताविक केल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य शंकरभाऊ मांडेकर यांच्या हस्ते नाम फलकाचे उद्घाटन झाले. त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे संघाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
त्याप्रसंगी मान्यवरांनी खालीलप्रमाणे आपले मनोगत व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या
१) शंकरभाऊ मांडेकर : जिल्हा परिषदे तर्फे जेष्ठ नागरिक संघास मदत करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.
२) शिवाजीराव बुचडे पाटिल : जेष्ठ नागरिक संघास वाचनालयासाठी माझ्या जागेत शेड बांधून देण्यात येईल.
३) सविता ताई दगडे पाटिल : जेष्ठ नागरिकांसाठी शासनाकडून मिळत असलेल्या सवलतीसाठी माझ्याकडुन पाठपुरावा करण्यात येईल.
शेवटी शिवाजीराव बुचडे पाटिल यांनी आभार प्रदर्शन केले. चहापाण्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.