हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरीत रक्तदान शिबिर व गरजू महिलांना धान्य वाटप

हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरीत रक्तदान शिबिर व गरजू महिलांना धान्य वाटप

पिंपरी : हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिर व गरजू महिलांना धान्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन शगुन चौक पिंपरी कँम्प येथे मातोश्री सामाजिक संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष गणेश आहेर यांच्या वतीने करण्यात आले होते.

यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेची पुजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी पिंपरी-चिंचवड संपर्क प्रमुख वैभव थोरात, महिला संपर्कप्रमुख वैशाली सुर्यवंशी, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, सहसंपर्कप्रमुख योगेश बाबर, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शहरप्रमुख सचिन भोसले, महिला संघटिका उर्मिला काळभोर, वैशाली मराठे, सरिता साने, वैशाली कुलथे, शैला पाचपुते, शिल्पा आनपण, भाग्यश्री म्हस्के, अल्पसंख्याक शहरप्रमुख हाजी दस्तगिर मनियार, चिंचवड विधानसभाप्रमूख आनंत कोऱ्हाळे, उपशहरप्रमुख हरिष नखाते, गुलाबराव गरुड, उपशहरप्रमुख पांडुरंग पाटील, समन्वयक माधव मुळे, भाविक देशमुख, संतोष सौंदनकर, खंडु शिरसाठ, दिपक कांबळे, अनिल पारचा, माऊली जगताप, अनिल पालांडे, हनुमंत पिसाळ यांच्यासह शहरातील शिवसैनिक व आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी संपर्कप्रमुख वैभव थोरात यांनी गणेश आहेर यांच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. तसेच थोरात व माजी आमदार चाबुकस्वार यांनी आहेर यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे संयोजन गणेश पाडुळे, गोरख पाटील, नवनाथ जाधव, प्रदिप दळवी, गणेश वाघमारे, बाळासाहेब गायकवाड, रविकिरण घटकार, अंकुश कोळकर, जितेंद्र जुनेजा, नारायण खुशलाणी, मारुती म्हस्के, दत्ता गिरी, भरत इंगळे, गणेश वाळुंज, दिपक भक्त, अक्षय घटकार, अमित आहेर, शंकर शिंगारे, करण आहेर यांनी केले.

Actions

Selected media actions