काळेवाडी : विद्यादीप शिक्षण संस्थेच्या माने शाळेत १५ वर्षावरील करोना प्रतिबंधक लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. १५ वर्षावरील मुला-मुलींचा या लसीकरण मोहिमेत स्वखुशीने सहभाग नोंदवला जात आहे. जास्तीत जास्त मुलांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. अक्षय गंगाराम माने यांनी मुलांना व पालकांना केले आहे.
मागील दोन वर्षांपासून करोना महामारीचे जगभरात थैमान सुरू आहे. त्यामध्ये लाको नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मात्र, शास्त्रज्ञांनी दिवसरात्र परिश्रम घेत करोना प्रतिबंधक लस तयार करण्यात यश मिळविले. त्यामुळे मानव जातीच्या संरक्षणासाठी महत्त्वाचे अस्त्र निर्माण झाले आहे. त्याही पुढे जाऊन आता १५ वर्षांवरील मुलांसाठीही लस तयार झाली आहे. आता या लसीचे लसीकरण मोठ्या प्रमाणात करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
त्याच अनुषंगाने काळेवाडीतील सामाजिक कार्यकर्ते व विद्यादीप शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. अक्षय माने यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. माने शाळेतील जवळपास सर्वच विद्यार्थ्यांचे लसीकरण पुर्ण झाले असून काळेवाडीतील जास्तीत जास्त मुलांना लसीकरण करण्याचा डॉ. माने यांचा प्रयत्न आहे.
या संदर्भात डॉ. माने म्हणाले की, शाळेतील १५ वर्षांवरील जवळपास सर्वच विद्यार्थ्यांना करोना प्रतिबंधक लसीकरण पुर्ण झाले आहे. तसेच ही मोहिम पुढेही जलद गतीने सुरू ठेवली जाणार असून मुलांचे करोना महामारीपासून संरक्षण करता येईल. यासाठी आमचा हा प्रयत्न आहे. याबाबत मुलांच्या पालकांमध्ये जनजागृती केली जात आहे.
लोकप्रतिनिधींनी जे काम करायला पाहिजे, ती कामे डॉ. अक्षय माने करत आहेत. आरोग्य शिबीर, नोकरी महोत्सव, मतदान नोंदणी, लसीकरण असे समाजपयोगी उपक्रम राबवत आहेत. अशा समाजसेवकांना लोकांनी संधी दिली पाहिजे.
प्रेम पाटोळे, नागरिक