प्रकाशाचा मार्ग दाखविणारी दिपमाळ मांगल्याचे प्रतीक : खा. डॉ. अमोल कोल्हेनगरसेविका वैशाली काळभोर यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या दिपमाळेचे उद्‌घाटन

प्रकाशाचा मार्ग दाखविणारी दिपमाळ मांगल्याचे प्रतीक : खा. डॉ. अमोल कोल्हेनगरसेविका वैशाली काळभोर यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या दिपमाळेचे उद्‌घाटन

पिंपरी (दि. ११ मार्च २०२२) अंधारातून प्रकाशाचा मार्ग दाखविणारी दिपमाळ हि मांगल्याचे प्रतिक आहे. देहू ते पंढरपूर या भक्ती मार्गावर काळभोरनगर येथे उभारलेली हि दिपमाळ आपल्या परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन घडवणारी आहे असे प्रतिपादन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.
गुरुवारी (दि. १० मार्च) चिंचवड काळभोर नगर येथे नगरसेविका वैशाली काळभोर यांच्या संकल्पनेतून बालाजी चौक येथे उभारलेल्या दिपमाळेचे उद्‌घाटन खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ उद्योजक शंकरराव पांढरकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट, नगरसेविका वैशाली काळभोर, मिनल यादव, पंकज भालेकर, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर आदींसह परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला उपस्थित होत्या.