बौद्ध नगरमधील अभिनयकौशल्य अवतरणार रंगमंचावर

बौद्ध नगरमधील अभिनयकौशल्य अवतरणार रंगमंचावर

पिंपरी : बौद्ध नगर मधील जिम हॉल येथे लहान मुला मुलींबरोबरच मोठ्यांचा उत्साह पाहायला मिळाला तो म्हणजे ऑडिशन च्या निमित्ताने. आपल्या परिसरातील विद्यार्थी आणि पालकांना एकत्रित रंगमंचावर अभिनय कला सादर करता यावी, म्हणून येथील परिवर्तन युवा एकताच्या वतीने कलाकारांची निवड चाचणी घेण्यात आली. यामध्ये एकूण 51 लोकांनी सहभाग घेतला. लहान मुला मुलींचा यात जास्त सहभाग आणि उत्साह दिसून आला. शनिवारी (दि 26 मार्च) या ऑडिशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

बौद्ध नगरमधील अभिनयकौशल्य अवतरणार रंगमंचावर

बौद्धनगर आणि भाटनगर मध्ये सामाजिक , शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक आणि भौगोलिक परिवर्तन घडवून अनण्याच्या उद्देशाने, परिवर्तन युवा एकताची स्थापना झाली असून सर्वांनी राजकीय हेवे दावे बाजूला ठेऊन परिसराचे परिवर्तन घडवून आणण्यासाठी एकत्रित काम करण्याचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी ठरवले आहे. या मध्येमातून जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बौद्धनगर मधील उच्च पदावर पोहचलेल्या महिलांचा सन्मान करून पाहिला कार्यक्रम यशस्वी केल्यानंतर आता येथील कला कौशल्य अवगत असलेल्या विद्यार्थी विद्यर्थीनी आणि पालकांना योग्य ती संधी उपलब्ध व्हावी म्हणन ऑडिशन ऑडिशन घेण्याचा यशस्वी कार्यक्रम झाला.

बौद्ध नगरमधील अभिनयकौशल्य अवतरणार रंगमंचावर

ऑडिशनसाठी आलेल्या सर्वच मुला मुलींबरोबर पालकांना नाटकात संधी मिळणार असून त्यांच्यासाठी 15 दिवसांसाठी मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. द रायझिंग स्टार्स थिएटसर्सचे संचालक लेखक दिग्दर्शक विनय सोनवणे हे अभिनय प्रशिक्षण देणार आहेत. तर लिटल सायंटिस्ट ग्रुपच्या वतीने विशेष सहकार्य देऊन येथील कलागुणांना वेगवेगळ्या मंचावर संधी उपलब्ध करून देण्याचे दत्ता गिरमकर यांनी सांगितले. ऑडिशन कार्यक्रमाच्या अयोजनामध्ये परिवर्तन युवा एकताचे सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.