पिंपळे सौदागर ग्रामस्थांतर्फे शेडगे परिवाराचे अभिनंदन

पिंपळे सौदागर ग्रामस्थांतर्फे शेडगे परिवाराचे अभिनंदन
  • संत तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी शेडगे परिवाराच्या “हिरा- राजा” बैल जोडीची निवड

वाकड : पंढरपूरला जाणाऱ्या देहू येथील संत तुकाराम महाराज यांच्या पालखीसाठी वाकड येथील शेडगे परिवाराच्या “हिरा- राजा” या बैल जोडीची निवड झाली. त्याबद्दल पिंपळे सौदागर ग्रामस्थांच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्या अनिताताई संदीप काटे, उद्योजक संदीप विठ्ठल काटे व उद्योजक निलेश विठ्ठल काटे यांच्याकडून ज्ञानेश्वर शेडगे व शेडगे परिवारास श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

त्याप्रसंगी हभप ऋषिकेश चोरगे महाराज, तात्या शिणगरे, बाबू शेलार, दीपक भिस्ट, शुभम मोहारे, निलेश काटे युवा मंचाचे पदाधिकारी व पिंपळे सौदागर ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी ऋषिकेश चोरगे महाराज यांनी आपल्या गोड बोलितून शेडगे परिवाराचे अभिनंदन करत, वारीसाठी शुभेच्छा दिल्या.

पिंपळे सौदागर ग्रामस्थांतर्फे शेडगे परिवाराचे अभिनंदन
पिंपळे सौदागर ग्रामस्थांतर्फे शेडगे परिवाराचे अभिनंदन