बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क
चिखली प्राधिकरण : येथील राजे शिवाजीनगर सेक्टर १६, संत शिरोमणी उद्यानाच्या बाजूला दत्त साई प्रतिष्ठानच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त ध्वजारोहणाचे आयोजन करण्यात आले होते.
दत्त साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी या ध्वजारोहणाचे आयोजन केलं होते. सुरुवातीला अजित गव्हाणे आणि कविता अल्हाट या मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाला दत्त साई प्रतिष्ठानचे सदस्य दत्तात्रय जगताप, गणेश ठोंबरे, ज्योती गोफने, अंजुषा नेरलेकर, किशोर दुधाडे, बाळासाहेब मुळे, लिटल स्टार स्कूलचे प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थी तसेच राजे शिवाजीनगर येथील सोसायट्यांचे चेअरमन आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.