पिंपरी, ता. १५ : यशस्वी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, यशस्वी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, यशस्वी इंग्लिश मिडीयम स्कूल व यशस्वी बालक मंदिर मध्ये ७५ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयाने आदर्शनगर, फातिमानगर, गंधर्व नगरी परिसरामध्ये काढलेल्या प्रभात फेरीत “भारत माता की जय” घोषणांनी परिसर न्हावून निघाला.
ध्वजारोहण यशस्वी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सदस्या जयमाला ठोबरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देवकाते, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शोभा देवकाते, संस्थेचे सचिव डॉ. तुषार देवकाते उपस्थित होते.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त (Independent day) विद्यार्थीनींनी देशभक्तीपर गीतावर सामूहिक नृत्य सादर केले. तसेच निकिता कुऱ्हाडे, श्वेता हरणे, कोलम पुंडकर, पार्थ येवले, अमित तेलगे, मोनिका चव्हाण, शालिनी उनवणे, योगेश्वर बिरादार, तनिष्का माने, मधु देशमुख, अंकिता तेलगे, गौरी तुपारे, अनम शेख, जहीर शेख, गायत्री जाधव, अमन सय्यद, ईश्वरी घोडके, जारा शेख, शबनम शेख, समर्थ टोलमारे, संकेत साबळे, कार्तिक मुरकुटे, श्रावणी मेटकर, काव्या डिगे, विहान गवळी, मायरा माने, आर्यन दराडे, हेरा फातिमा, शैलेश घोंगडे, समर्थ काळे, श्रेयांश यादव या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.