लोकमराठी न्यूज नेटवर्क
पुणे : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली LCB टिमने बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये दाखल (गु.र.नं. १९/२०१९ भादंवि क. ३९४, ३४) असलेल्या गुन्हयातील पाहिजे आरोपी (यादी क्र.१५५) सुरेश लक्ष्मण कर्चे (वय ३६, रा. सिंहगड रोड, गणेश मळा, चुनाभट्टी, १२२ पुणे-३०. मूळ रा. पिंपरी ता. माळशिरस जि. सोलापूर) याचा शोध घेवून त्यास ताब्यात घेतले.
दरम्यान, सदर आरोपी याची वैदयकिय तपासणी करुन बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले.
आरोपी कर्चे याच्यावर यापूर्वी उस्मानाबाद पोलीस स्टेशनमध्ये (गु.र.नं. २८/१२ भादंवि क.३९५) व सांगवी पोलीस स्टेशनमध्ये (गु.र.नं. ४२९/१४ भादंवि क.३०४-अ) गुन्हे दाखल आहेत.
ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, हवालदार महेश गायकवाड, निलेश कदम, रवि शिनगारे, सचिन गायकवाड, पोलीस नाईक सुभाष राऊत, गुरु गायकवाड, रौफ इनामदार, पोहवा. काशिनाथ राजापुरे यांनी केली.