अनंतनगरमध्ये कराटेची साहसी प्रात्यक्षिके सादर

अनंतनगरमध्ये कराटेची साहसी प्रात्यक्षिके सादर

पिंपळे गुरव : अनंतनगर तरुण मित्र मंडळ, अनंतनगर महिला मंडळ व वु-सू इंटरनॅशनल मार्शल आर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त कराटेचे साहसी प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

अनंतनगरमध्ये कराटेची साहसी प्रात्यक्षिके सादर

ग्रँड मास्टर शिहान विक्रम मराठे व राजेंद्र कांबळे यांची टीम प्रात्यक्षिके सादर केली. त्यामध्ये किक्स, पंचेस, काथाज, स्पायरिंग, मंगलोरी कौले हात व पायांच्या सहाय्याने तोडणे, डोक्यावर फरशी फोडणे तसेच सहा इंची खिळे मारलेल्या फळीवर झोपून पोटावर फरशा ठेवून १८ एलबीएस वजनाच्या घनाने तोडण्यात आली. त्याचबरोबर कार्यक्रमासाठी जमलेल्या सर्व नागरिकांना कराटेचे महत्व सांगण्यात आले.

आज आपण दूरचित्रवाणीवरून, वर्तमानपत्रांमधून पाहतोय अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचार होत असतात. त्याचेच ताजे उदाहरण म्हणजे नागपूर, अमरावती, डोंबिवली, पालघर, साकीनाका, पुणे आणि इतर ठिकाणी महिलावर अत्याचार झाले. यासाठी आपण आपल्या घरातील मुलींना कराटेचे प्रशिक्षण देऊन स्वतःचे स्वसंरक्षण कसे करता येईल, याचे धडे घ्यावेत. कारण, कोणतीही वाईट वेळ ही सांगून येत नाही. आपल्या आयुष्यात काहीतरी वाईट होऊन गेल्यानंतर शिकण्यापेक्षा अगोदरच कराटेचे प्रशिक्षण देऊन आपल्या घरातील महिलांना अशा वाईट प्रवृत्तीच्या लोकांचा प्रतिकार करण्याची ताकत दिली पाहिजे. या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच मंडळाच्या वतीने कराटेचे क्लासेसही यावेळी सुरू करण्यात आले.

अनंतनगर महिला मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सवाच्यामध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धांचे बक्षीस वितरण समारंभ याप्रसंगी पार पडला. त्यानंतर कार्यक्रमासाठी जमलेल्या सर्व नागरिकांना कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दूध वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे संयोजन अनंतनगर तरुण मित्र मंडळ व अनंतनगर महिला मंडळ यांनी केले.