पिंपरी : नवरात्रोत्सव आनंदाचा व नवचैतन्यचा उत्सव. या नवरात्रीच्या निमित्ताने भारतीय स्टेट बँकेच्या पिंपरी टाऊन शाखेत फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. तसेच विविध रंगी मनमोहक रांगोळी काढण्यात आली. त्यामुळे कर्मचारी व नागरिकांना एक प्रसन्न व उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे पहावयास मिळाले.
तसेच महिला कर्मचारी नऊ दिवस नवरंगी पोशाख परिधान करत होत्या. दरम्यान, भारतीय स्टेट बँक तर्फे आयोजित करण्यात आलेल्या आंतर शाखेच्या नवरात्री सजावट स्पर्धेत देखील पिंपरी टाऊन शाखेने सहभाग घेतला आहे. त्यासाठी शाखेतील प्रत्येकाने विशेष योगदान दिले.
शाखेचे मुख्य व्यवस्थापक श्रीश त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली अभिजीत गायकवाड, उमेश घोरपडे, सिमी थॉमस, संगीता बेहेरा, श्रुतिका राऊत, अनिता वायकर, अमृता कुलकर्णी, तेजस्विनी कुलकर्णी, रुपाली शनिवारे, प्रज्ञा लंबाते, निधी सक्सेना, स्वप्नील खोमणे, कमल अधारी यांनी संयोजन केले.