महात्मा फुले आणि बाबासाहेबांची जयंती सार्वत्रिक होणार नाही याची दक्षता घ्या; आंबेडकर यांचे आवाहन

महात्मा फुले आणि बाबासाहेबांची जयंती सार्वत्रिक होणार नाही याची दक्षता घ्या; आंबेडकर यांचे आवाहन

मुंबई (लोक मराठी) : सार्वत्रिक आंबेडकर, फुले जयंती होणार नाही याची दक्षता घ्या, असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी हे आवाहन करण्यात आलं आहे.

“११ एप्रिलला महात्मा फुलेंची जयंती आहे आणि १४ एप्रिलला आंबेडकर जयंती आहे. दरवर्षी दोन्ही जयंती एकत्रित साजरी केली जाते. यावर्षी कोरोना व्हायरसने भारतासह जगाला भेडसावलं आहे. त्यामुळे लोक चिंतीत आहे. कोरोना व्हायरसला रोखायचं असेल तर अंतर ठेवून वागायचं. मी सर्व फुले, शाहू, आंबेडकरी जनतेला आवाहन करतो, यंदा जयंती घरातच साजरी करावी.

जयंती कशी साजरी केली याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करुन सांगा. परंतु महात्मा फुले आणि बाबासाहेबांची जयंती सार्वत्रिक होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे” असं प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.

Actions

Selected media actions