#Coronavirus : पिंपरी – चिंचवडमधील आज मध्यरात्री ‘हे’ भाग होणार सील

#Coronavirus : पिंपरी - चिंचवडमधील आज मध्यरात्री 'हे' भाग होणार सील

पिंपरी, ता. 8 (लोक मराठी) : पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचे अधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनाचा अधिक प्रादुर्भाव होऊ नये, याकरता पिंपरी – चिंचवड शहरातील काही परिसर आज मध्यरात्रीपासून सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पिंपरी – चिंचवड महापालिका प्रशासनाने याबाबत माहिती दिली आहे. शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढू, नये याकरता अंमलबजावणी करण्यात आली आहे.

पिंपरी – चिंचवडमधील हे भाग होणार सील

पालिका प्रशासनाच्या माहितीनुसार; आज मध्य रात्री शहरातील चार भाग सील करण्यात येणार आहेत. यामध्ये पुढील भागांचा समावेश आहे.

१) पवार इंडीस्ट्रीयल परीसरातील घरकुल रेसीडेन्सी बिल्डींग क्र. ए १ ते २० चिखली.

२) जामा मस्जिद, खराळवाडी. (गिरमे हॉस्पीटल, अग्रेसन लायब्ररी, क्रिश्ना ट्रेडर्स, चैताली पार्क हौसिंग सोसायटी गार्डन, ओम हॉस्पीटल, ओरीयंटल बँक, सीटी प्राईड हॉटेल, क्रिस्टल कोर्ट हॉटेल, गिरमे हॉस्पिटल)

३) कमलराज बालाजी रेसीडेन्सी, रोडे रुग्णालयजवळ, दिघी, भोसरी (रोडे हॉस्पीटल, एसव्हीएस कॉम्प्युटर, स्वरा गिप्ट शॉपी, साई मंदीर रोड अनुष्का ऑप्टीकल शॉप, रोडे हॉस्पीटल).

४) शिवतीर्थ नगर, पडवळनगर थेरगाव (शिरोळे क्लिनिक, गणेश मंदीर, निदान क्लिनिक, किर्ती मेडीकल, रेहमानिया मस्जिद, ऑर्कीड हॉस्पिटल, अशोका सोसायटी रोडवरील गणपती मंदीर ते शिरोळे क्लिनिक).

पुण्यात कोरोनाचा कहर

पुण्यात आज सकाळपासून पाच जणांचा करोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १३ वर पोहोचली आहे. सकाळपासून पुणे शहरातील नायडू रुग्णालयात १, नोबेल रुग्णालयात १ आणि ससून रुग्णालयात ३ अशा एकूण पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी माहिती दिली आहे.