
मुंबई (लोकमराठी) : महाराष्ट्रात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोना बाधितांवर चांगले आणि प्रभावी उपचार करता यावेत यासाठी महत्वाची घोषणा केली आहे. करोनाग्रस्तांवर उपचारांसाठी चार भागांमध्ये आरोग्य सेवेची विभागणी करण्यात आली आहे.
ज्यांना सर्दी, खोकला, ताप ही लक्षणे असतील त्यांनी खासगी दवाखान्यात न जाता क्युअर क्लिनिकमध्ये जावे. प्रत्येक विभागात ही क्लिनिक असतील. त्याची माहिती देण्यात येईल असे उद्धव ठाकरे म्हणाले.
ज्यांच्यामध्ये करोनाची सौम्य लक्षणे असतील त्यांच्यासाठी एक वेगळं हॉस्पिटल असेल. थोडया जास्त प्रमाणात करोनाची लक्षणे असलेल्यांसाठी दुसरे हॉस्पिटल असेल आणि ज्यांच्यामध्ये करोनाची अतीतीव्र लक्षणे आहेत तसेच उच्च रक्तदाब, मधुमेह किडनी असे अन्य आजारही आहेत, त्यांच्यासाठी तिसरं रुग्णालय असेल.
- सोन्या-चांदीच्या किमतींनी नवे शिखर गाठले: पुढे काय?
- Viralvideo : प्रेमाच्या त्रिकोणातून मैत्रीचा संघर्ष; दोन मुलींची तुफान हाणामारी
- HADAPSAR : एस. एम. जोशी कॉलेज येथे एक दिवसीय जिल्हास्तरीय ‘लिंगभाव संवेदनीकरण’ कार्यशाळा संपन्न.
- Puran Poli Recipes : पुरणपोळी कशी बनवावी
- PIMPRI: दोन महिलांना मारहाण; तरुणाला अटक