रिसोड: आकडे टाकून वीज चोरी करणाऱ्या नागरिकांवर महावितरणानं कारवाईचा बडगा उगारला आहे. रिसोड तालुक्यातील भरजहागिर येथे महावितरण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रविण कुमार जंगले यांच्या मार्गदर्शनाखाली रिसोड ग्रामणीचे सहाय्यक अभियंता हरिष गिर्हे यांनी (दि.11) रोजी भरजहागिर येथे विज मिटर तपासणी आणि विज चोरी उघडकीस आणि आहे. वीज अधिनियम २००३ कलम १३५ अन्वये सतरा जणांवर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये गजानन नारायण मुरकुटे, श्रीराम पुंजाजी फुके, शंकर रुजाजी फुके, जगन्नाथ नारायण चोपडे, प्रल्हाद विठ्ठल चोपडे, बाळकृष्ण रामाजी चोपडे, बळीराम सिताराम चोपडे, अर्जुना तुळशीराम काळदाते, आत्माराम नारायण तायडे, रंगनाथ शिवराम सानप, भगवान बाजीराव सानप, नारायण हरिभाऊ सानप, राजू मोहन डहाके, सुधाकर विश्वनाथ जिरवणकर, भगवान शभुआप्पा पतवार, मोरया दुध डेअर (महाजन) गजानन मोटार रिवायडिंग दुकान (गजानन काळे) या लोकांचा विज करणाऱ्यामध्ये समावेश आहे.
सदर वीजचोरी शोध मोहिमेकरिता रिसोड ग्रामीणचे तंत्रज्ञ निलेश देशमुख, संदिप मुंडे, नितेश शिंदे, ज्ञानेश्वर मार्कड गजानन चांदुरकर, गणेश कोकाटे, अमोल इंगोले, आणि राजुकुमार गायकवाड यावेळी हजर होते.
तसेच यावेळी रिसोड ग्रामीणचे सहाय्यक अभियंता हरिष गिर्हे म्हणाले की, भर जहागिर गावामध्ये विज चोरी करणाऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे विज चोरी करणाऱ्यावर यापुढे कडक कारवाई करण्यात येईल व रिसोड ग्रामीण मध्ये सर्वत्र ही मोहिम राबण्यात येणार आहे. तसेच याआधी बिबखेडा आणि खडकी सदार येथे विज चोरी करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली होती.