एस. एम. जोशी कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन संपन्न

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन संपन्न

हडपसर, 15 ऑक्टोबर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेजमध्ये ग्रंथालय विभाग, सांस्कृतिक विभाग व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन संपन्न

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून श्री. पद्ममणी कला व वाणिज्य महाविद्यालय पाबळ येथील सुप्रसिद्ध कवी, लेखक, वक्ते प्रा. डॉ. हनुमंत भवारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, विद्यार्थ्याने कोणते तरी ध्येय ठेवून ते प्राप्त करण्यासाठी वाचन, लेखन, मनन व चिंतन करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्याने आयुष्यात यशस्वी होण्यासाठी थोर महापुरुषांची चरित्रे वाचणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या जीवनाला एक नवी दिशा मिळेल. वाचन हे माणसाला सक्षम बनवते व सत्याचा परिचय करून देते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध ग्रंथांचे वाचन केले पाहिजे. वाचनामुळे आपला व्यक्तिमत्व विकास होतो. असे मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी गाजलेली ‘बाप’ नावाची कविता सादर करून विद्यार्थ्यांची मने जिंकली.

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन संपन्न

कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी आपल्या आयुष्यात अनेक ग्रंथांचे वाचन केले. त्यामुळे त्यांच्या आयुष्याला वेगळळी दिशा मिळत गेली. विद्यार्थ्यांनी आपला पूर्व इतिहास समजून घेण्यासाठी विविध ग्रंथांचे वाचन केले पाहिजे. अलेक्झांडर मेल्यानंतर तो मोकळ्या हाताने हे जग सोडून गेला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संपत्तीच्या मागे न लागता पुस्तक वाचनाने स्वतःला समृद्ध करावे. असे मत त्यांनी व्यक्त केले.

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन संपन्न

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल प्रा.शोभा कोरडे, पाहुण्यांचा परिचय डॉ. अतुल चौरे यांनी तर आभार सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. शिल्पा शितोळे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नम्रता मेस्त्री यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय जगताप, उपप्राचार्य प्रा.संजय जडे, प्राध्यापक व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन संपन्न