एस. एम. जोशी कॉलेजमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन संपन्न

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन संपन्न

हडपसर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेजमधील मानसशास्त्र विभागाच्या वतीने 10 ऑक्टोंबर 2022 रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थी, प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी यांच्या मानसिक स्वास्थ्याबद्दल जागृती व्हावी यासाठी PSY FUN कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता. त्यामध्ये selfie Point, Psychological Movie, Posters, Lectures या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन संपन्न

यावेळी कॉलेजमधील मानसशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी मानसिक स्वास्थ्य या विषयावरील पोस्टर तयार करून त्याचे पोस्टर प्रदर्शन भरवण्यात आले होते. या पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. महेंद्र शिंदे सरांनी केले. तसेच यावेळी Selfie Point चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना Psychological Movie दाखविन्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. महेंद्र शिंदे यांनी आपल्या जीवनामध्ये मानसिक स्वास्थ्य किती महत्त्वाचे आहे याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन संपन्न

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्राचार्य डॉ.एन.एस.गायकवाड साहेब यांनी मानसिक स्वास्थ्य याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शैक्षणिक जीवनामध्ये आपले मानसिक स्वास्थ्य किती महत्त्वाची भूमिका बजावते याविषयी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मानसशास्त्र विभागप्रमुख प्रा. महेश देवकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनार्दन शिवरकर आणि श्रुतिका गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रा.मेघा तळपे यांनी मानले. कार्यक्रमासाठी उपप्राचार्य डॉ. संजय जगताप तसेच मोठ्या संख्येमध्ये विद्यार्थी वर्ग, प्राध्यापक व कार्यालयीन सेवक उपस्थित होते.