पिंपरी : चिंचवडगाव येथे प्रबुद्ध संघाच्या वतीने बुद्ध जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला भंते सुमेध बोधी उपस्थित होते. बुद्ध जयंती निमित्त सुरवातीला पंचशील झेंडा फडकविण्यात आला. या नंतर भंते यांनी मार्गदर्शन केले.
भंते सुमेध बोधी यांनी आपल्या धम्म देशने मध्ये सांगितले की, जगात एकच धम्म संस्थापक असा आहे, त्यांच्या जीवनात तीन घटना घडल्या त्यामध्ये जन्म, महानिर्वाण व ज्ञान प्राप्ती ही एकाच दिवशी झाली. वैशाख पौर्णिमेला झाली म्हणून हा दिवस बौद्ध राष्ट्रांत अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. बुद्ध धम्म महान आहे, काल संगत आहे, म्हणून आचरण करणे आवश्यक आहे. प्रचार, प्रसार करणे गरजेचे असून तरच भारत देशात बुद्ध धम्म वाढला जाईल.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रबुद्ध संघ सचिव आयुष्यमान किशन बलखंडे यांनी केले. प्रास्ताविक अध्यक्ष किशोर सोनवणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन महाराष्ट्र कराटे प्रशिक्षक आयुष्यमान अशोक कदम यांनी केले. या कार्यक्रमाला प्रबुद्ध संघाचे बहुतांश सभासद उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजु वासनिक, दिंगबर घोडके, डॉ. धर्मेंद्र रामटेके, अल्पणा गोडबोले यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.