काळेवाडी (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : रॉयल फाउंडेशनच्या वतीने शिवजयंती आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली. शिवजयंती निमित्त मुलांना खाऊ वाटप, तरूणांना करिअर मार्गदर्शन करण्यात आले तर महिलांना विविध सरकारी योजनांची माहिती देण्यात आली. तसेच रॉयल फाउंडेशनच्या माध्यमातून काळेवाडीत मोहल्ला क्लिनिक सुरू केले जाणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.
भारत माता चौक व रॉयल एकता चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यावेळी रॉयल फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष रवि नांगरे, ज्येष्ठ सल्लागार प्रकाश नांगरे, आनंद काटे, नरेंद्र नांगरे, पंकज पाटोळ, अशोक गायकवाड, खजिनदार गणेश नांगरे, प्रथम नांगरे, विक्की साळवे, अमित बोंगाळे, सागर पवार, विजय साळवे, सिद्धार्थ कसबे, रिहान शेख, सागर शेठ, अक्षय ताम्हणकर, निखिल ताम्हणकर, उध्दव डेरवणकर, आशा नांगरे, राधा काटे, निर्मला गजभिव, नंदिनी नांगरे, मनिषा गायकवाड, शितल पाटोळे, सुनिता खैरमोडे, सुनिता विश्वकर्मा यांच्यासह प्रभाग क्रमांक ३१ व ३२ मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्या प्रसंगी बोलताना रवि नांगरे म्हणाले की, मागील दोन वर्षांपासून करोना महामारीचे जगभरात थैमान सुरू आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्यांना योग्य मार्गदर्शनाची व आधाराची गरज आहे. कोरोना नियम शिथिल करण्यात आल्याने शिवजयंतीचे औचित्य साधून नागरिकांसाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न बाळगता नागरिकांच्या मदतीला धावून येणाऱ्या कोरोना योद्धा रूपी पोलिस बांधवांनी मोलाचे सहकार्य केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय काटे यांनी केले तर सुत्रसंचालन तुलसी नांगरे व हिरा साळवे यांनी केले.