कारवाईसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना दारुच्या दुकानात डांबले
वल्लभनगरमधील हिरामोती वाईन्स दुकानातील प्रकार
पिंपरी चिंचवड : प्लास्टिक पिशव्या वापरणा-या व्यवसायिकांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागातील काही कर्मचा-यांना मद्य विक्रीच्या दुकानात दुकानमालकाने डांबून ठेवले. हा प्रकार वल्लभनगर एसटी बस स्थानकाच्या समोरील हिरामोती वाईन्स शॉपी येथे शुक्रवारी (ता. 27) दुपारी बाराच्या सुमारास घडला.
सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दुकानमालक संतोष रमेश शिरभाते (वय 46) आणि रमेश शिरभाते (वय 65, दोघे रा. वल्लभनगर, पिंपरी) यांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी सुनिल हरिश चौहान (वय 54, रा. प्राची अपार्टमेंट, आनंद सिनेमा शेजारी, घोरपडी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरात प्लास्टिक विरोधी कारवाई करण्यात येत आहे. शुक्रवारी दुपारी ...