शरद पवारांच्या खांद्यावरून खाली उतरा | भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची आमदार रोहित पवारांवर जहरी टिका
https://youtu.be/DkZjycSXNN0
अहमदनगर : शरद पवार यांच्या खांद्यावर बसून मी महाराष्ट्रात सर्वात उंच आहे असा आभास झालेल्या रोहित पवार यांनी खाली मतदारसंघात उतरावे व मतदारसंघातील कामावर लक्ष द्यावे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सल्ले देत बसू नये,' अशी टिका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार रोहित पवारांवर केली आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघातील मिरजगाव येथून जात असताना तेथील रस्त्यांच्या दुरवस्थेवरून पडळकर यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला. त्यांनी खराब रस्त्यावर उभा राहून व्हीडिओ बनवला, व तो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
गेल्या पन्नास वर्षापासून नेतृत्व करणारे शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे या मतदारसंघाचे आमदार आहेत. मी आज औरंगाबादला दौऱ्यानिमित्त चाललो असताना त्यांच्या मतदारसंघात प्रवेश केल्यापासून रस्त्यावर प्रचंड खड्डे आहेत. रोहित ...