PUNE : लॉजमध्ये वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने आयुष्य संपवलं, पत्रात लिहिलं कारण; पोलिस दलात खळबळ
पुणे (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : पुण्यातून एक खळबळजनक महिती समोर आली आहे. पुण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. डेक्कनच्या एका लॉमध्ये विष प्राशन केल्याने जीवन संपवल्याचे समोर आले आहे. सांगली पोलीस दलात कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाने टोकाचं निर्णय घेतल्याने पोलीस विभागात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव सूरज मराठे आहे. ते सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून काम करत आहे. आजरपणाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आहे. डेक्कनच्या लॉजमध्ये जाऊन पोलिस अधिकाऱ्याने मृत्यूला कवटाळलं आहे. महत्त्वाचे म्हणजे अवघ्या 25 व्या वर्षी पोलीस दलात सहाय्यक निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली होती.
सूरज मराठे. यांचे कुटुंब देहू येथे वास्तव्यास आहे. ते सध्या सांगली पोलीस दल...







