एस. एम. जोशी कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा
हडपसर (प्रतिनिधी : डॉ. अतुल चौरे) : डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरा केला जातो. एस. एम. जोशी महाविद्यालयातील मराठी विभाग आणि सांस्कृतिक विभागामार्फत 'वाचन प्रेरणा दिनाचे' औचित्य साधून विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी घरी एक तास वाचन करण्याचा उपक्रम साजरा करण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून वाचन संस्कृती जोपासली जाईल. तसेच नवीन येणाऱ्या पिढीसमोर वाचनाचा आदर्श निर्माण होईल. अशी भावना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी व्यक्त केली.
या उपक्रमात महाविद्यालयातील शुभम शेंडे, मानसी गिरम, मुसैब शेख, जय दुधाळ, निलेश सोनावणे, प्रा. स्वप्निल ढोरे, डॉ. संदीप वाकडे, डॉ. नम्रता मेस्त्री याबरोबरच महाविद्यालयातील सर्व विभागातील विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी सहभाग घेतला. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय जगताप, उपप्राचार्य ड...