शैक्षणिक

Eduacational: Schools, Colleges.
LokMarathi News

कर्मवीर भाऊराव पाटील जयंती पिंपरीच्या महात्मा फुले महाविद्यालयात व सेकंड कॅम्पसमध्ये साजरी
पिंपरी चिंचवड, शैक्षणिक

कर्मवीर भाऊराव पाटील जयंती पिंपरीच्या महात्मा फुले महाविद्यालयात व सेकंड कॅम्पसमध्ये साजरी

पिंपरी : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३३ वी पिंपरीच्या महात्मा फुले महाविद्यालयात उत्साहात पार पडली. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड यांनी ऑनलाईन सेशनद्वारे विद्यार्थ्यी व प्राध्यापक यांना आण्णाच्या जीवनावर आधारीत माहिती दिली. कोरोनाच्या काळात कर्मवीरांच्या जयंतीचे औचित्य साधून यावेळी महात्मा फुले महाविद्यालयाने सोशल डिस्टसिंगचे सर्व नियम पाळून कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या आठवड्यात विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, लेखन स्पर्धा, वर्कृत्व स्पर्धा, काव्यवाचन, गीतगायन व छायचित्र स्पर्धांचे ऑनलाईन आयोजन केले होते. महाविद्यालयात सकाळी प्राचार्यांच्या हस्ते कर्मवीरांच्या पुतळ्याला हार घालून आजच्या जयंती सोहळ्याची सुरुवात झाली. यानंतर प्राचार्यांनी जयंतीनिमीत्त आयोजीत सर्व स्पर्धांचा ऑनलाईन आढावा घेतला. तसेच कर्मवीरांच...
शिक्षणासाठी निधी वाढविला तरच साक्षरता मोहीम प्रभावी होऊ शकते – डॉ. संजय खरात
पिंपरी चिंचवड, शैक्षणिक

शिक्षणासाठी निधी वाढविला तरच साक्षरता मोहीम प्रभावी होऊ शकते – डॉ. संजय खरात

महात्मा फुले महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन ऑनलाईन पध्दतीने साजरा पिंपरी : "घोकंमपट्टीच्या पुढे जाऊन ज्ञानाचे उपयोजन, प्रकटीकरण केले पाहिजे. साक्षरतेसाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहीजेत. शिक्षणासाठी दिला जाणारा निधी मोठ्या प्रमाणात वाढविला तरच साक्षरता मोहीम प्रभावी होऊ शकते. समाजासाठी, साक्षरतेसाठी प्राध्यापकांनी आपली सर्व संसाधने वापरली पाहिजेत" असे प्रतिपादन पुणे-गणेशखिंड येथील माॅडर्न काॅलेजचे प्राचार्य डॉ. संजय खरात यांनी केले. आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाच्या निमित्ताने आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानविस्तार कार्यक्रम महात्मा फुले महाविद्यालय येथे आॅनलाईन पध्दतीने साजरा करण्यात आला. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्राचार्य खरात बोलत होते.&n...
प्रा. किरण मोहिते यांना पीएचडी प्रदान
पिंपरी चिंचवड, शैक्षणिक

प्रा. किरण मोहिते यांना पीएचडी प्रदान

प्रा. डॉ. किरण मोहिते पिंपरी : महात्मा फुले महाविद्यालयातील वाणिज्य शाखेतील प्राध्यापक किरण बापू मोहिते यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने नुकतीच पीएच.डी प्रदान करण्यात आली आहे. 'नाबार्ड अधिकोषाचे आदिवासी शेतकऱ्यांच्या आर्थिक व सामाजिक विकासातील योगदानाचे चिकित्सक अध्ययन' या विषयावर प्रा. मोहिते यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रा. रामकृष्ण मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आकुर्डी येथील संशोधन केंद्रात आपला अभ्यास पुर्ण केला. अण्णासाहेब वाघेरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ओतूर येथील डॉ. तानाजी साळवे यांनी त्यांचे मार्गदर्शक म्हणून काम पाहिले. प्रा. किरण मोहिते यांना पीएचडी प्रदान झाल्याबद्दल महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कार्यालयीन कर...
शिक्षकांनी सातत्याने स्वतःमधील शिक्षक घडवत राहिला पाहिजे – डॉ. कॅप्टन सी. एम. चितळे
पिंपरी चिंचवड, शैक्षणिक

शिक्षकांनी सातत्याने स्वतःमधील शिक्षक घडवत राहिला पाहिजे – डॉ. कॅप्टन सी. एम. चितळे

शिक्षक दिनानिमित्त 'यशस्वी' संस्थेच्या वतीने आयोजित वेबिनार संपन्न पिंपरी : शिक्षकांनी सातत्याने स्वतःमधील शिक्षक घडवत राहिला पाहिजे असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्राचे संचालक डॉ. कॅप्टन.सी.एम.चितळे यांनी व्यक्त केले. शिक्षक दिनानिमित्त 'यशस्वी' संस्थेच्या वतीने आयोजित 'कौशल्य विकासात शिक्षकांची भूमिका' या विषयावरील वेबिनारमध्ये ते बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, शिक्षक हा बदलाचा महत्वपूर्ण घटक असून शिक्षकांनी आपल्या वागण्या-बोलण्यातून स्वतःच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा अध्यापन शैलीद्वारे अभ्यासाला पोषक वातावरण निर्मिती करण्याची कला अवगत करायला हवी. सध्या इंटरनेटमुळे माहितीचा प्रचंड साठा अवघ्या एका क्लिकवर सहज उपलब्ध होत असताना आपण विद्यार्थ्यांना वेगळे काय शिकवू शकतो, कशा पद्धतीने शिकवू शकतो याचा विचार सर्व शिक्षकांनी कर...
विद्यार्थ्यांनी उद्योग व्यवसायाकडे वळावे | प्रा. डॉ. स्नेहल तावरे यांचे आवाहन
पुणे, शैक्षणिक

विद्यार्थ्यांनी उद्योग व्यवसायाकडे वळावे | प्रा. डॉ. स्नेहल तावरे यांचे आवाहन

डॉ. आंबेडकर महाविद्यालयात "Thanks a Teacher अभियान" उपक्रम संपन्‍न पुणे : चालू काळाची गरज ओळखून विद्यार्थ्यांनी तंत्रस्नेही व्हायला पाहिजे. तसेच उद्योग व्यवसायाकडे वळावे, असे आवाहन स्नेहवर्धन रिसर्च इन्स्टिट्यूटचे प्रकाशक प्रा. डॉ. स्नेहल तावरे यांनी विद्यार्थ्यांना केले. औंध येथील रयत शिक्षण संस्थेचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त "Thanks a Teacher अभियान" उपक्रम संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्नेहवर्धन रिसर्च इन्स्टिट्यूटचे प्रकाशक प्रा. डॉ. स्नेहल तावरे बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ. अरुण आंधळे उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी पाहुण्यांची प्रश्नोत्तराच्या स्वरूपात वार्तालाप केला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या...
एस. एम. जोशी कॉलेजच्या प्राचार्यपदी डॉ. चंद्रकांत खिलारे
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजच्या प्राचार्यपदी डॉ. चंद्रकांत खिलारे

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील नामांकित एस. एम. जोशी कॉलेज हडपसर येथे डॉ. चंद्रकांत खिलारे हे प्राचार्य म्हणून रुजू झाले आहेत. ते शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर विज्ञान शाखेचे अधिष्ठाता, सिनेट सदस्य, आणि अकॅडमीक कौन्सिलचे सदस्य होते. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बॉटनी अभ्यास मंडळावर त्यांनी काम पाहिले आहे. दहिवडी कॉलेज दहिवडी, राजर्षी शाहू कॉलेज कोल्हापूर, बळवंत कॉलेज विटा येथे प्राचार्य म्हणून त्यांची कारकीर्द उत्तम ठरली आहे. संशोधनाची दृष्टी असणारे ते संशोधक अभ्यासक व उत्तम प्रशासक आहेत. यूजीसीच्या माध्यमातून त्यांनी अनेक मेजर व मायनर रिसर्च प्रोजेक्...
Chinchwad : पोदार शाळेत व्हर्च्युअल ई-लर्निग
शैक्षणिक

Chinchwad : पोदार शाळेत व्हर्च्युअल ई-लर्निग

चिंचवड, (लोकमराठी) : कोरोना विषाणूचा फैलाव दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे शाळा पुन्हा सुरू होण्याची शक्यता कमी आहे. म्हणून चिंचवड येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये व्हर्च्युअल ई-लर्निगच्या माध्यमातून मुलांसाठी ऑनलाईन अभ्यासक्रम घेतला जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही. असे प्राचार्य शहनाज कोटार यांनी सांगितले. शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील नाते आतुट राहण्यासाठी हा अभ्यासक्रम घेतला जात असून विद्यार्थी शाळेचा सगळा अनुभव घेत आहेत. या उपक्रमास शाळेच्या प्राचार्य शहनाज कोटार यांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षक विशेष शैलीने विद्यार्थांना मार्गदर्शन करीत आहेत. त्यातच विद्यार्थ्यांना आपले शिक्षक व वर्गमित्र यांच्यासोबत संवाद साधला जातो. त्यामुळे विदयार्थी खेळीमेळीने शिक्षणाचा आनंद घेत असल्याचे प्राचार्य कोटार यांनी सांगितले....
देव-दर्शन युवा मंच तर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व शुभेच्छा
शैक्षणिक

देव-दर्शन युवा मंच तर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व शुभेच्छा

लोकमराठी न्यूज नेटवर्क चिंचवड : पिंपरी-मोहननगर मध्ये, देव-दर्शन युवा मंच पिंपरी चिंचवड शहर तर्फे दहावी च्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षा विषयी मार्गदर्शन करून शुभेच्छा देण्यात आल्या. त्यावेळी दिपक रामचंद्र जाधव यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेच्या कालावधीमध्ये तंदुरुस्त शरीर कसे ठेवायचे, वेळेचे नियोजन कसे करायचे याबाबत माहिती दिली. त्याप्रसंगी दिनेश सेन, नागेश पवार, शरद लावंडसर, आशा सेन आणि वैशाली गायकवाड यांनी उपस्थिती होत्या. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून कार्यक्रमांची सांगता करण्यात आली....
नवीन टेक्नॉलॉजीची अद्यावत माहिती गरजेची, अन्यथा दुष्परिणामांना सामोरे जावे लागेल – डॉ. प्रमोद देव
पुणे, शैक्षणिक

नवीन टेक्नॉलॉजीची अद्यावत माहिती गरजेची, अन्यथा दुष्परिणामांना सामोरे जावे लागेल – डॉ. प्रमोद देव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात राज्यस्तरीय चर्चासत्राचे उद्घाटन औंध (लोकमराठी) : टेक्नॉलॉजीचा वापर आपण योग्य पद्धतीने व काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. बऱ्याचदा आपण टेक्नॉलॉजीच्या आहारी जातो. त्यामुळे आपण यांत्रिक होतो. इंटरनेट ऑफ थिंग्सचा (IOT) वापर जीवनाच्या अनेक क्षेत्रात केला जात आहे. उदा.स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, स्मार्ट कार, स्मार्ट सिटी व स्मार्ट शेती इतर क्षेत्रांमध्ये आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर केला जात असून, या नवीन टेक्नॉलॉजीची अद्यावत माहिती आपण करून घेणे गरजेचे आहे. अन्यथा त्याच्या दुष्परिणामांना आपणास सामोरे जावे लागेल. मानवी मेंदूत मर्यादित डेटा साठवण्याची क्षमता असल्याने, मानवाने कॉम्प्युटर, मोबाईल फोन व पेन ड्राईव्ह यासारख्या यंत्रांचा शोध लावला आहे. मानवाने बदलत्या तंत्रज्ञानानुसार आपल्या ज्ञानात बदल करायला हवेत. तरच तो बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात आपले अस्तित्व सिद...
आर्थिक महासत्ता होण्यासाठी ‘रिसर्च ॲण्ड नॉलेज बेस इकॉनॉमी’ हवी – डॉ. अरविंद नातू
पिंपरी चिंचवड, शैक्षणिक

आर्थिक महासत्ता होण्यासाठी ‘रिसर्च ॲण्ड नॉलेज बेस इकॉनॉमी’ हवी – डॉ. अरविंद नातू

पीसीसीओईआर मध्ये ‘अविष्कार 2019’ स्पर्धा संपन्न, साठ अभियांत्रिकी महाविद्यालयांचा सहभाग पिपंरी : सध्याची भारतीय अर्थव्यवस्था ‘सर्व्हिस बेस इकॉनॉमी’ प्रकारातील आहे. भारताला जागतिक महासत्ता होण्यासाठी हि अर्थव्यवस्था ‘रिसर्च ॲण्ड नॉलेज बेस इकॉनॉमी’ मध्ये वाढवावी लागेल. असे मार्गदर्शन आयसरचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद नातू यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय आणि संशोधन केंद्र येथे (पीसीसीओईआर) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या सहकार्याने ‘अविष्कार 2019’ या अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या उद्‌घाटन प्रसंगी डॉ. नातू बोलत होते. यावेळी जेकेएलएमपीएसचे संचालक मानसिंग कुंभार, विद्यापीठाच्या आयक्युएसीचे प्रमुखे डॉ. मनिष वर्मा, पीसीसीओईआरचे प्राचार्य हरिष तिवारी, प...