डॉ. आंबेडकर महाविद्यालयात दंत आरोग्य चिकित्सा मार्गदर्शनपर उपक्रम संपन्न
औंध : रयत शिक्षण संस्थेचे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात अर्थशास्त्र विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, प्राथमिक विद्यामंदिर व जिल्हा आरोग्य केंद्र, औंध यांच्या संयुक्त विद्यमाने 'दंत आरोग्य चिकित्सा' मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमासाठी दंतवैद्य जिल्हा रुग्णालय औंध येथील डॉ. सुहासिनी घाणेकर (Dr. Suhasini Ghanekar ) या उपस्थित होत्या. त्यांनी प्राथमिक शाळेतील मुलांना व पालकांना मार्गदर्शन केले. त्यांनी सुरुवातीला चांगल्या दातांचे महत्त्व पटवून दिले. दात खराब असतील, किडलेले असतील, तुटलेले असतील, वाकडेतिकडे उगवले असतील तर अशा व्यक्तीचे सौंदर्य लोप पावते. मुलांचे दात दुखत असतील तर मुले रात्रभर पालकांना झोपू देत नाही. पालकांचे दात दुखत असतील तर वेदना जाणवल्यामुळे कामावर लक्ष लागत नाही. यासाठी दातांची निगा प्रत्येकाने राखली पाहिजे. मुलांचे व पालकांचे दात ...