विशेष लेख

मानवतेचा महामेरू एस. एम. जोशी
विशेष लेख

मानवतेचा महामेरू एस. एम. जोशी

श्रीधर महादेव जोशी म्हणजेच एस. एम. जोशी (एस. एम) यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे १२ नोव्हेंबर १९०४ रोजी झाला. त्यांचे मूळ गाव हे कोकणमधील रत्नागिरीजवळील 'गोळप' हे होय. त्यांचे (S M Joshi) शिक्षण बी.ए., एल.एल.बी., डी.लीट. असून पुणे विद्यापीठाने त्यांना डी.लीट या पदवीने त्यांच्या देशसेवेच्या कार्याबद्दल सन्मानित केले होते. त्यांना वाचनाची प्रचंड आवड होती. देशासाठी कार्य करत असताना त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. त्यात तुरुंगवासही त्यांच्या वाट्याला वारंवार आला. अशा या तुरुंगवासातील दिवसांमध्ये सुद्धा त्यांनी वाचनाची आवड जोपासली. या दिवसांत कार्ल मार्क्सच्या विविध ग्रंथांचे वाचन, विविध साप्ताहिकांतील अग्रलेखांचे वाचन, गुजराती कादंबऱ्यांचे वाचन, मानवेंद्रनाथ रॉय यांचे 'Tasks before us' या पुस्तकाचे वाचन. इत्यादी ग्रंथांचे वाचन त्यांनी केले होते. याव्यतिरिक्त तुरुंगामधी...
उदारमतवादी व पुरोगामी निर्माण देणारे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आता सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश
विशेष लेख

उदारमतवादी व पुरोगामी निर्माण देणारे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आता सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश

जयश्री इंगळे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आज भारताच्या सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्त झालेत. त्यांचा कार्यकाळ नोव्हेंबर 2024 पर्यंत म्हणजे अजून दोन वर्षे असणार आहे. गेल्या काही वर्षातील सरन्यायाधीशांचा कार्यकाळ अल्प होता. त्यातही या पदापर्यंत पोहोचण्यापर्यंतची आणि पदावर असतांनाची कारकीर्द वादग्रस्त म्हणावी लागेल. (दीपक मिश्रा, बोबडे, गोगोई आणि लळीत). सरन्यायाधीश चंद्रचूड यांची देखील भूतकाळातील कारकीर्द उल्लेखनीय आहे. अलिकडच्या काळातील अनेक ऐतिहासिक निकाल देणार्‍या खंडपीठांचा ते सदस्य होते आणि त्यांचे अनेक निर्णय उदारमतवादी आणि पुरोगामी आहेत. त्यातील काही महत्त्वाचे निवाडे खालीलप्रमाणे: 1) 20 ते 24 आठवडे गर्भवती असलेल्या अविवाहित महिलांना विवाहित महिलांप्रमाणे सुरक्षित गर्भपात करण्याचा अधिकार देणे. 2) वैवाहिक बलात्कार हा गुन्हा ठरवणे. 3) इच्छा...
पुरुष मर्द आणि स्त्री नाजूक? — जेट जगदीश 
विशेष लेख, मनोरंजन, मोठी बातमी

पुरुष मर्द आणि स्त्री नाजूक? — जेट जगदीश

'हर हर महादेव' हा (Har Har Mahadev 2022) चित्रपट म्हणजे एकूण सगळा विनोदच आहे. पण ते तसेच सोडून देऊन चालणार नाही. कारण या चित्रपटाचे निर्माते हे हिंदुत्ववादाने भारलेले धर्मांध आहेत आणि नवीन पिढीमध्ये आपल्या सोयीचा इतिहास लिहून चुकीचा संस्कार रुजवण्यात हातभार लावणारे आहेत. त्यामुळे त्यांना योग्य वेळी धडा शिकवलाच पाहिजे. पण या चित्रपटात मांजरेकरचा मुलगा कोवळा दिसतो म्हणून त्याची खिल्ली उडवणे मात्र योग्य नाही. कारण 'पुरुष म्हणजे मर्द' अशी जी एकूण पुरुषाची प्रतिमा तयार केली गेलेली आहे तीच मुळात चुकीची आहे. आज आपण अशा चुकीच्या कल्पनांमुळे कोवळ्या दिसणाऱ्या पुरुषाची खिल्ली उडवतो, हे तर त्याहूनही असंस्कृतपणाचे लक्षण आहे. एकूण जगभर पुरुषसत्ताक अवस्था घट्ट रुजवताना स्त्री आणि पुरुषांना विशिष्ट चौकटीत अडकवले गेले आहे. कारण माणूस जेव्हा शेती करू लागला आणि एका जागी स्थिर झाला तेव्हा स्त्रीला बाळंतपण...
असा असतो ख्रिश्चन धर्मीयांचा बैल पोळा सण 
विशेष लेख

असा असतो ख्रिश्चन धर्मीयांचा बैल पोळा सण

कामिल पारखे श्रीरामपूरला आमच्या आजूबाजूला साजरा होणाऱ्या अनेक सणांपैकी काही सण आमच्याही घरात साजरे व्हायचे, बैलपोळा हा त्यापैकी एक. या सणाच्या काही दिवस आधीच आमच्या `पारखे टेलर्स' या दुकानापाशी असलेल्या मेनरोडला मातीपासून बनवलेल्या रंगीबेरंगी बैलांच्या जोड्या विक्रीला ठेवलेल्या असत. बैलपोळ्याच्या आदल्या दिवशी यापैकी मग पांढऱ्या, उंचच उंच खिलारी बैलांची एक जोडी घरात यायची. त्या बैलांची आमच्या घरात पूजा होत नसायची, मात्र दिवसभर मग या बैलजोड्यांशी माझा खेळ चालायचा. https://youtu.be/2uGPVWDy1pU बैलपोळा संपल्यानंतर अनेक दिवस या बैलजोड्या भिंतीवरच्या फळ्यांवर असायच्या, झावळ्यांचा रविवारी (Palm Sunday) घरी आणलेल्या झावळ्या अनेक दिवस अल्तारापाशी असायच्या, अगदी तसेच. काही दिवसांनी शिंगे मोडलेली किंवा एखादा पाय मोडलेल्या बैलांच्या जोड्या मग आम्हा मुलां...
समाजाची भावी पिढी घडवणारा शिक्षक सुख-सुविधांपासून वंचित 
विशेष लेख

समाजाची भावी पिढी घडवणारा शिक्षक सुख-सुविधांपासून वंचित

सीमा किरण मोहिते आज ५ सप्टेंबर शिक्षक दिन विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या शिक्षकवर्गविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. आजच्या दिवशी आपल्याला जगात आणणाऱ्या आई-वडिलांपासून ते आपला हात हातात धरून धूळपाटीवर श्री गणेशा काढायला शिकवणाऱ्या ते आपल्या शालेय जीवनाची इमारत पूर्ण उभी करणाऱ्या अशा अनेक विवध रूपात आपल्या आयुष्यात येणाऱ्या शिक्षकवर्गाविषयी आदर व्यक्त करण्याचा दिवस. भारताचे भविष्य वर्गाच्या चार भिंतीत आकारास येत असते. घर हे मुलाच्या जीवनातील पहिली शाळा आई हा पहिला गुरु जीवनातील अनेक कटू गोड प्रसंगांना सामोरे जाण्याचे मार्गदर्शन करणारी आई असते नंतर मूल शाळेतील शिक्षकाच्या सहवासात येते. येथे त्याची व्यक्तिमत्व विकासास येते. प्राचीन काळी गुरुकुल शिक्षण पद्धती अस्तित्वात होती. गुरुच्या घरी शिक्षण घेण्यास जावे लागत असे. गुरुगृही स्वतःची कामे स्वतः करावी लागत होती. गुरुना शिक्षण पूर्ण झाल्...
सामाजिक, वैचारिक दृष्टी बदलल्यावर शिक्षकदिन तमाम शिक्षकांसाठी खरा शिक्षक दिन ठरेल
विशेष लेख

सामाजिक, वैचारिक दृष्टी बदलल्यावर शिक्षकदिन तमाम शिक्षकांसाठी खरा शिक्षक दिन ठरेल

डॉ. मोहिते के. बी. जीवनातील सर्वात पहिले गुरु म्हणजेच आई वडील. जीवनात आई-वडिलांची जागा कोणीच घेऊ शकत नाही कारण, त्यांनी आपल्याला या सुंदर जगात आणले. आई-वडिलांनंतर शिक्षकाकडून बऱ्याच नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. शिक्षकांना दुसरे पालक म्हटले जाते. चांगले व्यक्तिमत्व घडवणे, चांगले संस्कार करणे, शिस्तीत राहणे, योग्य शिक्षण देऊन जगासमोर उभे राहण्याची ताकद शिक्षकांमुळे येते. शिक्षक एकाच बागेत विभिन्न रूप, विविध रंगाचे फुल सजवणाऱ्या माळयाप्रमाणे असतो. विद्यार्थ्यांना काट्यावर हसत चालण्यासाठी प्रेरित करतात. आजही मला शिकवणारे प्राथमिक शिक्षक आठवतात. ज्यांनी मला घडवलं, जीवनाला दिशा दिली, आपली जडणघडण करण्यात सर्वप्रथम प्राथमिक गुरूंचा वाटा खूप मोठा आहे. प्राथमिक शिक्षक ते पदव्युत्तर पर्यंतचे शिक्षक आज देखील आठवतात. मनाला भावनिक स्पर्श करून जातात. शिक्षक म्हणजे विशाल वृक्ष सारखे व्यक्तिमत्...
नेते, कार्यकर्ते व पैसा नसतानाही इंदिरा गांधी पुन्हा देशाच्या पंतप्रधान बनल्या
विशेष लेख, मोठी बातमी, राजकारण

नेते, कार्यकर्ते व पैसा नसतानाही इंदिरा गांधी पुन्हा देशाच्या पंतप्रधान बनल्या

लोकमराठी न्यूज नेटवर्क : पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीत लोकांच्या मुलभूत अधिकारांवरच गदा आली होती. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा दारून पराभव झाला. मात्र, त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचे नेते सोडून गेलेले असताना पुरेसे कार्यकर्ते व पैसा नसतानाही त्या पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान झाल्या. याचा अनुभव ज्येष्ठ पत्रकार कामिल पारखे यांनी सांगितला. https://youtu.be/KOZTDLxle4w हे ही वाचा 👇 नथुराम आणि गांधीजी पंधरा वर्षांनंतर महाराष्ट्राने निवडला मुस्लीम खासदार जोश्यांनीं कधी हातात नांगर धरलाय का? दोष धर्मांधतेचा...
पक्षपातीपणा कोण करतंय, मुस्लिमद्वेष्ट्ये हिंदुत्ववादी की प्रदूषण नियंत्रण मंडळ?
विशेष लेख

पक्षपातीपणा कोण करतंय, मुस्लिमद्वेष्ट्ये हिंदुत्ववादी की प्रदूषण नियंत्रण मंडळ?

जेट जगदीश 'प्रदूषण नियंत्रण मंडळाविरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे आंदोलन' 23 ऑगस्टच्या लोकसत्तेतील या बातमीत, 'पाच वेळा मशिदीच्या भोंग्यांद्वारे होणाऱ्या प्रदूषणाकडे दुर्लक्ष केले जाते आणि केवळ हिंदूंच्या सणाच्या वेळी प्रदूषण होते असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला वाटते. त्यामुळे ते फक्त हिंदूंच्या विरोधात पक्षपाती कारवाई करतात. म्हणून त्यांनी हिंदूंवर 230 खटले आणि मुसलमानांवर 22 खटले भरले. तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करा.' असा आरोप केल्याचे वाचले. पण भारतातील लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार खटल्यांचे प्रमाण अगदी योग्य आहे. कारण महाराष्ट्रात काय की भारतात काय हिंदूंची संख्या सुमारे 80 टक्के आणि मुसलमानांची संख्या 14 टक्के आहे. खटल्यांचे प्रमाणही जवळपास तेवढेच भरते. याचा अर्थ प्रदूषण मंडळाचे लोक कुठल्याही प्रकारे पक्षपात करत नाहीत, हेच सिद्ध होत नाही काय? तसेच DJ कधीतरीच ...
रणजित डिसले अमेरिकेला रवाना…
विशेष लेख

रणजित डिसले अमेरिकेला रवाना…

हेरंब कुलकर्णी आज पहाटे रणजित डिसले फुलब्राईट शिष्यवृत्ती च्या ६ महिन्याच्या अभ्यासासाठी अमेरिकेला रवाना झाला. माझ्या राज्यातील ही जागतिक शिष्यवृत्ती मिळालेला तो पहिला शिक्षक आहे याचा मला अभिमान आहे. विमानतळावर तिरंगा घेऊन काढलेला त्याने फोटो पाठवला तेव्हा मन भरून आले.रणजितला देशाचा अभिमान वाटतोय पण आम्हाला मात्र त्याचा अभिमान वाटला नाही तर आम्ही त्याला शिक्षणक्षेत्रावरील कलंक ठरवला... अवघ्या ३४ वर्षाचा हा पोरगा उरलेल्या आयुष्यात अनेक प्रकारे कर्तृत्व दाखवेल याची मला खात्री आहे....काही गोष्टींना काळ हेच उत्तर असते. त्याने चुका केल्या की नाही? हे चौकशी समिती ठरवेल, त्यावर कारवाया त्याला कोर्टात आव्हान हे सर्व काही होईल, पण त्या वादा वादीपलीकडे एका खेड्यात काम करणारा एक प्राथमिक शिक्षक आज अमेरिकेत एक प्रतिष्ठित शिष्यवृत्ती मिळवतोय याचा अभिमान वाटतो. शिक्षण व्यवस्थेवर त्य...
विशेष लेख : वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे…..
विशेष लेख

विशेष लेख : वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे…..

डॉ. संदीप वाकडे आज दिनांक २३ जुलै. आजचा हा दिवस 'वनसंवर्धन दिन' म्हणून साजरा केला जातो. आज एकविसाव्या शतकामध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निर्माण होणाऱ्या विविध संस्था आपण पाहत आहोत. याचे कारण उशिरा का होईना आपल्याला समजलेले पर्यावरणाचे महत्त्व हे होय. अलीकडे आपण पाहतो की अनेक नेते मंडळी स्वतःच्या वाढदिवसाचा डामडौल करतात आणि तो मी काहीतरी सामाजिक उपक्रमांनी साजरा केला अशी शेखी मिरवितात. या सामाजिक उपक्रमामध्ये ते व त्यांचे कार्यकर्ते ओसाड जमिनीवर किंवा रस्त्याच्या दुतर्फा मोठमोठे खड्डे घेऊन वृक्षारोपण करताना दिसतात. फोटोसेशन्स करून बातमी वर्तमानपत्राला देतात. झाडे लावून ही मंडळी मोकळी होते पण झाड लावले म्हणजे आपली जबाबदारी पार पडली असे नव्हे तर ते झाड जसे आपण पोटच्या लेकरांचे संगोपन करतो, त्यांना लहानाचे मोठे करतो, अगदी तसेच ते झाडही जपले पाहिज...