समाजकार्यासह सिटिजन सोशल रिस्पाँन्सिबिलिटी ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी – राज्यपाल
मुंबई : सीएसआरतंर्गत समाजासाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या कॉपोरेट कंपन्यांचा सत्कार करण्यासाठी आयोजित द सीएसआर जर्नल एक्सलन्स पुरस्कार – 2021 सोहळा आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या व्यतिरिक्त माजी वित्त, नियोजन आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते सयाजी शिंदे, समाजसेवक . डॉ. प्रकाश बाबा आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे आणि द सीएसआर जर्नलचे संपादक अमित उपाध्याय, मुंबई पोलिस कमिश्नर संजय पांडे, राज्याच्या संसर्गजन्य प्रतिबंधक विभागाचे प्रमुख डॉ प्रदीप आवटे आदी मान्यवरांनी आवर्जून उपस्थिती लावली होती.
हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे. आपल्या देशात आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा आदर राखणे ही सुद्धा आपली एक सामाजिक ...









