महाराष्ट्र

सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करावा – लॉयन डॉ. सुरेंद्र भोसले
महाराष्ट्र

सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करावा – लॉयन डॉ. सुरेंद्र भोसले

ठाणे : सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र आहे, त्याचा वापर अतिशय जबाबदारीने करायला हवा. त्याचे जेवढे फायदे आहेत तर तेवढाच त्याचा गैरवापर सुद्धा होऊ शकतो, याचे भान ठेवून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी अतिशय जबाबदारीने या सोशल मीडियाचे तंत्र अवगत करून घेणे गरजेचे आहे. तसेच त्या माध्यमातून पुरोगामी विचार प्रभावीपणे समाजामध्ये घेऊन जायचे आहे. असे प्रतिपादन लॉयन डॉ. सुरेंद्र भोसले यांनी राज्य सोशल मीडिया तर्फे आयोजित एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी काढले. या कार्यशाळेला ठाणे जिल्ह्यातील बहुतांश शाखेतील पदाधिकारी आणि नवीन कार्यकर्ते यांनी चांगला प्रतिसाद दिला. राज्य सोशल मीडिया चे सदस्य श्री प्रसाद खुळे हे या कार्यक्रमाचे संयोजक होते तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य प्रा. प्रवीण देशमुख यांनी पुढाकार घेऊन कुमुद बंगल्यातील ...
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हल्लेखोरांना शोधण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश
महाराष्ट्र, मोठी बातमी

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हल्लेखोरांना शोधण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

मुंबई ता. 8: राज्य शासन एसटी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सर्वतोपरी पावले उचलत आहे. मुंबई उच्च न्यायालयाला शासनाने काय काय निर्णय घेतले आहेत त्याची व्यवस्थित माहिती दिली आहे. न्यायालयदेखील या सर्व प्रकरणी लक्ष ठेवून असून यासंदर्भातील निर्णयदेखील त्यांनी दिला आहे, मात्र आज ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या घरावर झालेल्या या अचानक हल्ल्याची घटना अत्यंत निंदनीय असून याला जबाबदार असणाऱ्यांवर तसेच हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. नेत्यांच्या किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या घरांवर हल्ले करणे हा पायंडा महाराष्ट्राने कधीही पाडलेला नाही असेही ते म्हणतात. मुख्यमंत्री आपल्या प्रतिक्रियेत म्हणतात की, एसटी कर्मचारी त्यांच्या मागण्यांसंदर्भात आंदोलन करीत असले तरी राज्य शासनाने कधीही त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले नाही. मह...
भाजप कर्जत तालुका उपाध्यक्ष भाऊसाहेब गावडे यांचा इन्सानियत फाउंडेशनतर्फे सत्कार
महाराष्ट्र

भाजप कर्जत तालुका उपाध्यक्ष भाऊसाहेब गावडे यांचा इन्सानियत फाउंडेशनतर्फे सत्कार

कर्जत : भारतीय जनता पार्टी कर्जत तालुका उपाध्यक्ष पदी भाऊसाहेब सोपान गावडे यांची निवड झाली. त्यानिमित्त चांदे बुद्रूक येथील इन्सानियत फाउंडेशनचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते चाँद भाई मुजावर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमोल खोमणे, ग्रामपंचायत सदस्य नितीन जगधने, योगेश जगधने, तात्यासाहेब जगताप व युवा नेते नंदकुमार नवले, माजी सरपंच अनिल सुर्यवंशी, अनिल खोमणे, चेअरमन गोकुळ नवले, नितीन गंगावणे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, गावडे यांची निवड झाल्याने पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्याला तालुक्याचा उपाध्यक्ष पदाचा मान व जबाबदारी मिळाल्याबद्दल ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सर्वांकडून त्यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात येत आहे....
धनंजय मुंडेंच्या मुंबईतील जनता दरबारास पुन्हा सुरुवात; पहिल्याच दिवशी अभ्यागतांच्या रांगा
महाराष्ट्र

धनंजय मुंडेंच्या मुंबईतील जनता दरबारास पुन्हा सुरुवात; पहिल्याच दिवशी अभ्यागतांच्या रांगा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद चंद्र पवार यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या 'थेट मंत्री व जनता यांची भेट - जनता दरबार' अंतर्गत मुंबई पक्ष कार्यालयातील जनता दरबारास सोमवार (दि. 04) पासून पूर्ववत सुरुवात झाली असून, आजपासून सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या जनता दरबारास सायंकाळी 4 ते 6 या वेळेत सुरुवात झाली आहे. आज या जनता दरबारात अभ्यागतांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. जनता दरबारात भेटीस आलेल्या प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेत, त्यांच्या काम किंवा अडचणीचा तोडगा जागीच काढणे, संबंधितांस फोन वरून सूचना देत किंवा आवश्यक तेथे पत्र देऊन इत्यादी मार्गांनी समोरच्या व्यक्तीने काम जागच्या जागी मार्गी लावणे, हे धनंजय मुंडे यांच्या जनता दरबाराचे वैशिष्ट्य मानले जाते; त्यामुळे आज त्यांच्या जनता दरबारास नेहमीप्रमाणे मोठी गर्दी पहावयास मिळाली. मागील दोन वर्षांच्या काळ...
खा.युवराज संभाजीराजे छत्रपती आणि मंत्री छगन भुजबळ यांची भेट
महाराष्ट्र

खा.युवराज संभाजीराजे छत्रपती आणि मंत्री छगन भुजबळ यांची भेट

मी वंशज, पण भुजबळ हे शाहू महाराजांच्या विचारांचे खरे वारसदार – खा. युवराज संभाजीराजे छत्रपती बहुजन समाजाला एकत्र ठेवण्याचे माझे प्रयत्न – खा.युवराज संभाजीराजे छत्रपती बहुजन समाजाच्या प्रश्नांसाठी आम्ही एकमेकांना ताकद देऊ – मंत्री छगन भुजबळ छत्रपती शाहू महाराज यांनी पहिल्यांदा देशात अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसींना आरक्षण दिले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेची निर्मिती करून आरक्षण दिले. छत्रपती शाहू महाराज यांनी बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम केलं आहे. मी त्यांचा वंशज असून त्यांनी केलेलं काम पुढे अविरत सुरु ठेऊन बहुजन समाजाला एकत्र ठेवण्याचे माझे प्रयत्न आहे. मी जरी वंशज असलो तरी मंत्री छगन भुजबळ यांनी शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा समर्थपणे चालविला असून ते त्यांच्या विचारांचे वारसदार असल्याचे प्रतिपादन खा.युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आज केले. तर बहु...
किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी करा!: नाना पटोले
महाराष्ट्र

किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी करा!: नाना पटोले

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र. आमदार नाराज असल्याच्या भाजपाकडून अफवा, मविआ सरकार स्थिर. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षाने एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना किमान समान कार्यक्रमाच्या (CMP)आधारे हे सरकार चालवण्याचे ठरले होते. कोरोना संकटामुळे त्याची अंमलबजावणी करण्यात अडथळा आला होता परंतु आता परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नाना पटोले म्हणतात, जातीयवादी शक्तींना सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी आणि समाजातील सर्व घटकांचा सर्वांगिण विकास साधण्याच्या हेतूने २०१९ साली तीन पक्ष एकत्र आले. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष...
गुढीपाडव्यापासून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध मागे; नववर्षापासून नवीन संकल्प करुयात – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
महाराष्ट्र

गुढीपाडव्यापासून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध मागे; नववर्षापासून नवीन संकल्प करुयात – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात. जुनं ते मागे सारुन नवीन कार्याचा प्रारंभ करणारा हा दिवस. गेल्या दोन वर्षापासून आपण कोरोनाच्या भयंकर विषाणूचा यशस्वीरित्या मुकाबला केला आणि आज हे सावट दूर होताना दिसते. एक नवीन सुरुवात करण्यासाठी म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये कोरोना काळात लावण्यात आलेले निर्बंध गुढीपाडव्यापासून (2 एप्रिल) पूर्णपणे उठवण्यात येत आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घोषित केले. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळाच्या वतीने राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. मात्र कोरोनाचा भविष्यात धोका उद्भवू नये यासाठी नागरिकांनी मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे, कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. आरोग्याचे नियम पाळून आपली तसेच इतरांची देखील काळजी घ्यावी, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. याबाबतीतले सविस्तर आद...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुढीपाडव्याला ‘मराठी भाषा भवन’चे भूमिपूजन
महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुढीपाडव्याला ‘मराठी भाषा भवन’चे भूमिपूजन

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते मराठी भाषा भवन, मुख्य केंद्र या इमारतीचे भूमिपूजन मराठी नववर्ष दिनी गुढीपाडव्याला (दि. 2 एप्रिल 2022) सकाळी अकरा वाजता होणार आहे. जवाहर बालभवन चर्नी रोड येथे होत असलेल्या या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह मराठी भाषामंत्री सुभाष देसाई, मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख, मराठी भाषा राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम, लोकसभा सदस्य अरविंद सावंत, विधानसभा सदस्य मंगलप्रभात लोढा उपस्थित राहणार आहेत. मराठी भाषा भवनाचे मुख्य केंद्र दक्षिण मुंबई परिसरात आणि उपकेंद्र ऐरोली, नवी मुंबई येथे बांधण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला होता. मराठी भाषा भवन व मराठी भाषा उपकेंद्रांचे बांधकाम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून होणार आहे. मराठी भाषा भवन मुख्य केंद्र उभारणीकरिता गिरगाव, जवाहर बाल भवन, चर्नीरोड, मुंबई ये...
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला मेट्रो ४ मार्गाच्या कामांचा आढावा
महाराष्ट्र

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला मेट्रो ४ मार्गाच्या कामांचा आढावा

ठाणे शहरात सुरू असलेल्या मेट्रो 4 मार्गाच्या कामांची तसेच या मार्गावरील रस्त्यांच्या कामांची आज पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. पावसाळ्यापूर्वी मेट्रोच्या मार्गाखालील रस्त्यांच्या दुरुस्तीची व सेवा रस्त्यांची कामे पूर्ण करावीत, असे निर्देश यावेळी श्री. शिंदे यांनी दिले. ठाणे शहरातील मॉडेला नाका ते कासारवडवली या मार्गावरील कामांची श्री. शिंदे यांनी पाहणी केली. यावेळी माजी महापौर नरेश म्हस्के, महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्यासह एमएमआरडीए, मुंबई मेट्रो महामंडळ, एमआरडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री. शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी तसेच रस्ते व रेल्वेवरील ताण...
राज्य निवडणूक आयुक्तांच्या स्थायी समिती सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट
महाराष्ट्र

राज्य निवडणूक आयुक्तांच्या स्थायी समिती सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट

देशातील विविध राज्य निवडणूक आयुक्तांच्या स्थायी समितीने आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली. यावेळी राज्य निवडणूक आयुक्तांच्या स्थायी समितीचे अध्यक्ष तसेच दिल्ली व चंदीगडचे राज्य निवडणूक आयुक्त एस के श्रीवास्तव, महाराष्ट्राचे राज्य निवडणूक आयुक्त यु पी एस मदान, हरयाणाचे राज्य निवडणूक आयुक्त धनपत सिंह व राज्याचे माजी राज्य निवडणूक आयुक्त जे एस सहारिया उपस्थित होते....