महाराष्ट्र

‘द कश्मीर फाइल्स’ करमुक्त करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष, हा कोणता ‘राष्ट्र’वाद ? – हिंदु जनजागृती समिती
महाराष्ट्र

‘द कश्मीर फाइल्स’ करमुक्त करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष, हा कोणता ‘राष्ट्र’वाद ? – हिंदु जनजागृती समिती

मुंबई : ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करण्याच्या संदर्भात विधीमंडळात निवेदन करतांना महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केलेले वक्तव्य हिंदूंप्रतीची असंवेदनशीलता व्यक्त करणारे आहे. देशभरात प्रचंड प्रमाणात गाजत असलेला द काश्मीर फाईल्स हा चित्रपट वर्ष 1990 मधील काश्मिरी हिंदूंच्या विस्थापनाविषयी आहे कि वर्ष 1947 च्या भारताच्या फाळणीविषयी, हेच राज्याच्या गृहमंत्र्यांना माहीत नसणे, हे दुर्दैवी आहे. वर्ष 1947 मधील फाळणीच्या वेळी झालेल्या पाकिस्तानातील शीख आणि हिंदू यांच्या विस्थापनालाही त्यांनी ‘इकडून तिकडून येणे-जाणे झाले’, असे सहज म्हणणे, हे गृहमंत्री असणार्‍या व्यक्तीला शोभत नाही. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तुरुंगात असणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जुलै 2020 मध्ये ‘मुहंमद : द मेसेंजर ऑफ गॉड’ या इराणी चित्रपटावर दंगेखोर म्हणून ओळख...
प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात हिंदु राष्ट्रासाठी संघटितपणे कार्य करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार
महाराष्ट्र

प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात हिंदु राष्ट्रासाठी संघटितपणे कार्य करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार

भगवान श्रीकृष्णाकडून प्रेरणा घेऊन धर्मसंस्थापनेसाठी कार्य करूया - रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक मुंबई : इतिहासातील चुकांची पुनरावृत्ती करू नका, अशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची शिकवण होती. आजही भारतातील प्रत्येक भागात छोटे पाकिस्तान निर्माण झाले आहेत. स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवणारे हिंदूंना संपवण्याची धमकी देत आहे. अशा स्थितीत हिंदूंनाही स्वरक्षणासाठी आपली ताकद वाढविण्याशिवाय पर्याय नाही. रामराज्य स्थापन करणे, हा आपला उद्देश आहे, हे विसरता कामा नये. प्रभु श्रीराम हे आपले आदर्श आहेत; मात्र शत्रूला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी कृष्णनीतीचा उपयोग करायला हवा. महाभारतात भगवान श्रीकृष्णाने हातात शस्त्र घेतले नाही; त्यांनी युद्ध करण्यासाठी प्रेरणा दिली. आपणही भगवान श्रीकृष्णाकडून प्रेरणा घेऊन धर्मसंस्थापनेसाठी कार्य करायला हवे. असे प्रतिपादन स्वातंत्...
लातूर जिल्ह्यातील बसस्थानकांच्या पुनर्बांधणीची कामे तातडीने पूर्ण करावीत – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख
महाराष्ट्र

लातूर जिल्ह्यातील बसस्थानकांच्या पुनर्बांधणीची कामे तातडीने पूर्ण करावीत – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

मुंबई, दि. 14 : लातूर जिल्ह्यातील बसस्थानकांची सुरू असलेली पुनर्बांधणीची कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले. लातूर जिल्ह्यात ज्या बसस्थानकांच्या पुनर्बांधणीची कामे सुरू आहेत तेथील कामांच्या प्रगतीचा श्री.देशमुख यांनी आढावा घेतला. यावेळी एसटी महामंडळाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. उदगीर, निलंगा, देवणी, औसा, लामजना आणि कासारशिरसी येथील बसस्थानकांची पुनर्बांधणी करण्यात येत आहे. यापैकी औसा आणि लामजना येथील सुरू असलेली कामे तातडीने पूर्ण व्हावीत तसेच इतर कामांपैकी ज्या कामाची फेरनिविदा काढणे आवश्यक आहे ती प्रक्रिया पूर्ण करून कामे एका वर्षात पूर्ण करावीत. त्याचप्रमाणे एसटी महामंडळामार्फत करण्यात येणाऱ्या ज्या कामासाठी निधीची आवश्यकता असेल त्यासाठी परिवहन मंत्र्यांकडे पाठपुरावा...
महाराष्ट्र

राज्यात लवकरच ७ हजार २३१ पदांची पोलीस भरती – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची विधानसभेत घोषणा

मुंबई, दि. १४ – पोलीस भरती २०१९ मधील रिक्त असलेल्या ५ हजार २९७ पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून निवडलेल्या उमेदवारांना लवकरच नेमणुका देण्यात येणार आहेत. त्याशिवाय येत्या काही दिवसात ७ हजार २३१ पदांची पोलीस भरती करण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभेत केली. दरम्यान, विरोधी पक्षनेत्यांनी दिलेल्या पेनड्राईव्हची सत्यता तपासण्यात येणार असून या प्रकरणात कुणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही असे सांगून संपूर्ण प्रकरणाची वस्तुस्थिती समोर यावी यासाठी हे प्रकरण चौकशीसाठी सीआयडीकडे सोपविण्याचा निर्णय गृहमंत्र्यांनी विधानसभेत जाहीर केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि इतर सदस्यांनी उपस्थित केलेल्या नियम २९३ च्या प्रस्तावाला उत्तर देताना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील बोलत होते. ते म्हणाले की, राज्यात पोलीसांनी उत्तम कामगिरी केली असून ‘२०२० या वर...
मतदान प्रक्रियेतील महिला, नवमतदारांचा सहभाग महत्त्वाचा – केंद्रीय निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडेय
महाराष्ट्र

मतदान प्रक्रियेतील महिला, नवमतदारांचा सहभाग महत्त्वाचा – केंद्रीय निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडेय

मतदान प्रक्रियेतील महिला, नवमतदारांचा सहभाग महत्त्वाचा – केंद्रीय निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडेय औरंगाबाद,दि.14 (विमाका) :- मतदान प्रक्रिया सर्वंकषरित्या यशस्वी होण्यासाठी महिला, नवमतदार यांचा सहभाग महत्वाचा आहे, हे लक्षात घेऊन त्यांची परिपूर्ण नोंदणी करुन सर्व पात्र मतदारांचा मतदान प्रकियेतील सहभाग वाढवण्याच्या सूचना केंद्रीय निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडेय यांनी आज येथे दिल्या. औरंगाबाद येथील हॉटेल ताज विवांता मध्ये आयोजित मुख्य निवडणूक कार्यालयाच्या मार्फत राबविण्यात येत असलेल्या स्वीप (सिस्टमॅटिक व्होटर एज्युकेशन ॲण्ड इलेक्टोरल पार्टिसिपेशन) मतदार जनजागृती कार्यक्रम तसेच मतदार यादी कार्यक्रमाच्या आढावा बैठकीत श्री.पांडेय यांनी संबंधितांना सूचना दिल्या. बैठकीस महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे, भारत निवडणूक आयोगाच्या स्वीप कार्यक्रमाचे संचालक...
महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत १५ मार्च रोजी राज्यस्तरीय बाल आधार नोंदणी शुभारंभ
महाराष्ट्र

महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत १५ मार्च रोजी राज्यस्तरीय बाल आधार नोंदणी शुभारंभ

नागरी बाल विकास केंद्रांचा विस्तार योजना कार्यक्रम मुंबई, दि. 14 : राज्यस्तरीय बाल आधार नोंदणी शुभारंभ आणि नागरी बाल विकास केंद्र पथदर्शी कार्यक्रमाचा आढावा आणि विस्तार योजनेचा शुभारंभ दि. 15 मार्च रोजी महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमास महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, भारत सरकारच्या युआयडीएआयचे उपसंचालक सुमनेश जोशी, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रूबल अग्रवाल, महाआयटीच्या व्यवस्थापकीय संचालिका जयश्री भोज, युनिसेफच्या पोषण विशेषज्ञ राजलक्ष्मी नायर उपस्थित रहाणार आहेत. महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे मंगळवार दि. 15 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2.30 या वेळेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत सन 2021-22 या वर्षासाठी ...
क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्प राज्यासाठी दिशादर्शक ठरेल – जलसंपदामंत्री जयंत पाटील
महाराष्ट्र

क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्प राज्यासाठी दिशादर्शक ठरेल – जलसंपदामंत्री जयंत पाटील

सांगली, दि. 13, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यातील क्षारपड जमिनीचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित होता. तो आता जलसंपदा विभागाच्या क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पाअंतर्गत मार्गी लागणार आहे. जलसंपदा विभागाच्या माध्यमातून भूमिगत चर योजना तयार करण्यात आली आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील कवठेपिराण, उरण इस्लामपूर, आष्टा, कसबे डिग्रज व बोरगाव या गावांतील क्षारपड जमीन विकासासाठी 93 कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीपैकी 80 टक्के निधी शासन व 20 टक्के निधी शेतकऱ्यांनी द्यावयाचा आहे. यामध्ये सर्वाधिक 38 कोटींचा निधी कवठेपिराण या गावासाठी मंजूर करण्यात आला आहे. हा पथदर्शी प्रकल्प राज्यासाठी दिशादर्शक ठरेल असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. मिरज तालुक्यातील कवठेपिराण येथे जलसंपदा विभागाच्यावतीने क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पाअंतर्गत पथदर्शी भूमिगत चर ...
वित्त राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडला महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी २०२१-२२ चा अहवाल
महाराष्ट्र

वित्त राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडला महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी २०२१-२२ चा अहवाल

मुंबई, दि. 10 : राज्याच्या अर्थव्यवस्थेत २०२१-२२ च्या पूर्व अनुमानानुसार १२.१ टक्के वाढ, देशाच्या अर्थव्यवस्थेत ८.९ टक्के वाढ तसेच दरडोई राज्य उत्पन्न 2,25,073 अपेक्षित असल्याचे आर्थिक पाहणी अहवालात नमूद करण्यात आले आहे. वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2021-22 मांडला. सेवा आणि उद्योग क्षेत्रात भरीव वाढ अपेक्षित आर्थिक पाहणीनुसार यंदाच्या आर्थिक वर्षात कृषि व संलग्न कार्ये क्षेत्रात ४.४ टक्के वाढ, उद्योग क्षेत्रात ११.९ टक्के वाढ आणि सेवा क्षेत्रात १३.५ टक्के वाढ अपेक्षित आहे. पूर्वानुमानानुसार 2021-22 मध्ये सांकेतिक (‘नॉमिनल’) (चालू किंमतीनुसार) स्थूल राज्य उत्पन्न 31,97,782 कोटी अपेक्षित आहे. वास्तविक (‘रिअल’) (सन 2011-12 च्या स्थिर किंमतीनुसार) स्थूल राज्य उत्पन्न 21,18,309 कोटी अपेक्षित आहे. 2021-22 अर्थसंकल्पीय अ...
लोक अदालतमध्ये १२ मार्च रोजी पक्षकारांनी व वकिलांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन
महाराष्ट्र

लोक अदालतमध्ये १२ मार्च रोजी पक्षकारांनी व वकिलांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन

मुंबई, दि 10 : दक्षिण मुंबई जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने १२ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले आहे. संबधित पक्षकारांनी राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये सहभागी होऊन आपले वाद सामोपचाराने मिटवावेत, असे आवाहन दक्षिण मुंबई ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षा स्नेहा म्हात्रे यांनी केले आहे. ज्या पक्षकारांची ग्राहक तक्रारी संबंधित प्रकरणे दक्षिण मुंबई जिल्हा आयोगासमोर प्रलंबित आहेत त्यांनी आपली प्रकरणे सामंजस्याने मिटविण्याकरिता जिल्हा आयोग कार्यालयाशी संपर्क साधावा. या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये सहभागी होऊन आपले वाद सामोपचाराने कायमचे मिटवावेत, असेही त्यांनी सांगितले आहे...
विधानसभा इतर कामकाज
ताज्या घडामोडी, महाराष्ट्र, राजकारण

विधानसभा इतर कामकाज

मुंबई दि. 10 : आदिवासींसाठीच्या पदभरतीला गती देण्यासाठी विशेष पदभरती मोहीम राबविण्यात येणार असून याबाबत एकत्रित बैठक घेण्यात येईल, असे सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री श्री. दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत सांगितले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत अर्धा तास चर्चेत सहा विषयांवर चर्चा झाली. अधिसंख्य कर्मचाऱ्यांबाबत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री श्री. छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या उपसमितीचा अहवाल आल्यावर निर्णय घेण्यात येईल, असे श्री. भरणे यांनी सांगितले. सदस्य श्री. सुधीर मुनगंटीवार व श्री.संदीप दुर्वे यांनी उपस्थित केलेल्या चर्चेस उत्तर देताना ते बोलत होते. चंद्रपूर जिल्ह्यातील विसापूर येथील बॉटनिकल गार्डनच्या कामाला गती मिळावी, याविषयी चर्चा झाली त्याला उत्तर देताना सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या...