पिंपरी चिंचवड

SSC Results 2025 : पिंपरी-चिंचवड शहराचा निकाल ९७.९७ टक्के
पिंपरी चिंचवड, शैक्षणिक

SSC Results 2025 : पिंपरी-चिंचवड शहराचा निकाल ९७.९७ टक्के

पिंपरी चिंचवड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या वतीने मार्च २०२५ मध्ये घेतल्याला दहावी परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि. १३) दुपारी एक वाजता जाहीर झाला. पिंपरी-चिंचवड शहराचा निकाल ९७.९७ टक्के लागला आहे. त्यामध्ये मुले ९५.४७ टक्के तर मुलींनी ९७.७७ टक्के मिळवून बाजी मारली. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये निकालाविषयी उत्कंठा दाटली होती. मंगळवारी ऑनलाईन पध्दतीने जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. शहरातुन दहावीच्या परिक्षेसाठी शहरातून १९,९१६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यामध्ये परीक्षेला एकूण १९,८६७ विद्यार्थी बसले होते. त्यामधून एकूण १९,४६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये ८३८३ विद्यार्थी डिस्टिंक्शन घेऊन पास झाले आहेत. प्रथम श्रेणीत ६,६८५ , द्वितीय श्रेणीत ३,५८७ , पास श्रेणीत ८१० पास झाले आहेत. शहरातील तब्बल १२५ विविध माध्यमांच्या शाळांनी...
J&K : पहलगाममधील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा पिंपरी चिंचवड काँग्रेसच्या वतीने निषेध
पिंपरी चिंचवड

J&K : पहलगाममधील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा पिंपरी चिंचवड काँग्रेसच्या वतीने निषेध

मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना वाहीली श्रद्धांजली पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) - जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील पर्यटकांवर दहशतवाद्यांनी मंगळवारी हल्ला केला. या गोळीबारात २८ पर्यटक मृत्यूमुखी पडले. या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा पिंपरी (Pimpri) येथे जाहीर निषेध आणि मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयुआय व काँग्रेस कमिटीच्या (Congress party) वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दहीतुले (Abhimanyu Dahitule), पिंपरी चिंचवड महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सायली नढे (Sayali Nadhe), युवकाध्यक्ष कौस्तुभ नवले, ॲड. उमेश खंदारे, सौरभ शिंदे, हिरा जाधव, स्वाती शिंदे, आशा भोसले, प्रियंका सगट, प्रज्ञा जगताप, रंजना सौदेकर, जय ठोंबरे, आबा खराडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. जम्मू ...
PCMC : आरोग्य व वैद्यकीय विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा द्या
पिंपरी चिंचवड

PCMC : आरोग्य व वैद्यकीय विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा द्या

महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सायली नढे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी पिंपरी, दि. ५ (प्रतिनिधी) - महापालिकेच्या आरोग्य विभाग व वैद्यकीय विभागामधील कंत्राटी कामगारांना आरोग्य विमा कवच तसेच महापालिकेच्या सर्व हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार मिळावेत. अशी मागणी पिंपरी चिंचवड महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सायली नढे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे. याबाबत नढे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या खूप झपाट्याने वाढत आहे, ते पाहता महापालिकेने वैद्यकीय सेवा व आरोग्य सेवांमध्ये बदल करून कंत्राटी कामगारांची संख्या वाढवली आहे. त्यामुळे नागरिकांना सेवा प्रदान करण्यामध्ये कोणतीही अडचण येत नाही. वैद्यकीय सेवा व आरोग्य सेवा हे अत्यावश्यक सेवेमध्ये येतात. तसेच सर्व कंत्राटी कामगार आपल्या जीवाची परवा न करता शहरातील नागरिकांना आरोग्...
शिवजयंतीनिमित्त फ्रेंड्स ट्रेकिंग क्लबची अतिशय दुर्गम भागातील भैरवगड व घनचक्कर गडावर यशस्वी चढाई
पिंपरी चिंचवड

शिवजयंतीनिमित्त फ्रेंड्स ट्रेकिंग क्लबची अतिशय दुर्गम भागातील भैरवगड व घनचक्कर गडावर यशस्वी चढाई

पिंपरी चिंचवड : शिवजयंती निमित्त फ्रेंड्स ट्रेकिंग क्लबचा 119 वा ट्रेक दिनांक 15 व 16 मार्च 2025 रोजी अतिशय दुर्गम भागातील अहिल्यानगर जिल्ह्यातील, अकोले तालुक्यातील, शिरपुंजे गावामध्ये भैरवगड व घनचक्कर असे दोन गड येथे आयोजित केले होते. या ट्रेकमध्ये सर्वात लहान तीन वर्षाच्या आयुष रहाणे तसेच अनन्या बालघरे, राही जाधव, चिरायू बर्गे या बाल वीराने भाग घेतला होता. त्याचबरोबर भगवान खेडेकर वय 75 या ज्येष्ठ नागरिकांनी सह 85 सदस्यांनी भाग घेतला होता. सकाळी पावणे साडेसहाला वाजता ट्रेकिंगला सुरुवात केली. सर्वात प्रथम फ्रेंड्स ट्रेकिंग क्लबचे अध्यक्ष वसंत ठोंबरे यांनी सर्वांचे स्वागत करून सर्व सुरक्षिततेच्या नियम यासंबंधी सर्व सूचना दिल्या. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील अतिशय दुर्गम अशा शिरपुंजे गावापासून ट्रेकिंगला सुरुवात झाली. घनचक्कर आणि भैरवगड यांच्यामधील घळीतून किल्ल्यावर जाणारी...
HOLI : होळी करा लहान; पोळी करा दान। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आवाहन
पिंपरी चिंचवड

HOLI : होळी करा लहान; पोळी करा दान। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आवाहन

पिंपरी , दि. १० - "होळी लहान करा, पोळीचे दान करा," हे संदेश देत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पिंपरी-चिंचवड शाखेने होळी सणाच्या निमित्ताने एक सामाजिक उपक्रम आयोजित केला आहे. समितीने अपशब्द आणि शिव्या यांचे दहन करून, चांगल्या गोष्टी व विचारांचे आचरण करण्याचे आवाहन केले आहे. होळीला वाहण्यात येणारी पोळी संकलित करण्याचा उपक्रम अंनिसच्या वतीने २६ वर्षांपासून देहूरोड येथे यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. यामध्ये संकलित केलेली पुरणपोळी देहूरोड येथील गरीब वस्तीमध्ये ग्रामस्थांकडून वाटप केली जाते. या वर्षीही नागरिकांना पर्यावरणपूरक, साधेपणाने घरगुती होळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. देहूरोड येथील चिंचोली येथील पोळी संकलन उपक्रमात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन या सामाजिक कार्यात हातभार लावावा, असेही अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सांगितले आहे. समितीच्या या उपक्रमामुळे होळीच्या ...
PIMPRI : गाथा सन्मानाची : कर्तृत्ववान महिलांचा गुणगौरव सन्मान सोहळा
पिंपरी चिंचवड

PIMPRI : गाथा सन्मानाची : कर्तृत्ववान महिलांचा गुणगौरव सन्मान सोहळा

पिंपरी, दि. 9 : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन राष्ट्रवादी महिला काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षा प्रा. कविता आल्हाट यांच्या वतीने "गाथा सन्मानाची" या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये आपले अमूल्य योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा यावेळी गौरव करण्यात आला. हा सन्मान सोहळा रविवार, ९ मार्च २०२५ रोजी संध्याकाळी पाच वाजता गोदावरी आंगण, बोऱ्हाडे वाडी, मोशी येथे पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष प्रा. कविता आल्हाट यांनी केले. या कार्यक्रमात महिला सक्षमीकरणाला चालना देणाऱ्या आणि समाजहितासाठी कार्य करणाऱ्या महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या, विशेषतः परिचारिका, शिक्षिका, ब्युटीशियन, पोलीस कॉन्स्टेबल, तसेच इतर विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या महि...
PIMPRI : पिंपरी मार्केट येथे वाहन मुक्त दिनानिमित्त लहान मुले,ज्येष्ठ नागरिक, महिलांनी घेतला मनमुराद फिरण्याचा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचाही आनंद
पिंपरी चिंचवड

PIMPRI : पिंपरी मार्केट येथे वाहन मुक्त दिनानिमित्त लहान मुले,ज्येष्ठ नागरिक, महिलांनी घेतला मनमुराद फिरण्याचा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचाही आनंद

महानगरपालिकेने राबविलेल्या उपक्रमाचे व्यापारी, दुकानदार आणि नागरिकांकडून कौतुक पिंपरी, दि. ९ मार्च २०२५ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ८ व ९ मार्च २०२५ रोजी सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत पिंपरी बाजार परिसरात (साई चौक ते महर्षी वाल्मिकी चौक) अशा प्रकारचा पहिलाच वाहन-मुक्त दिवस साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद अबालवृद्धांनी घेतला. लहान मुले, महिलांचा देखील मोठा सहभाग या उपक्रमात दिसून आला. वाहन मुक्त दिनानिमित्त रस्ते सुरक्षा, कमी प्रदूषण क्षेत्र, पादचारी मार्ग व सायकल ट्रॅकचे महत्त्व, सार्वजनिक वाहतूक आणि नागरिकांच्या सहभागावर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला. सर्व वयोगटांसाठी विविध मनोरंजनात्मक उपक्रम देखील येथे पार पडले. कार्यक्रमस्थळी संपूर्ण ५०० मीटर रस्त्यावर उ...
CHINCHWAD : नद्यांच्या संवर्धनासाठी आणि नदीकाठ विकास प्रकल्पाविरोधात पिंपरी-चिंचवडकरांचा मानवी साखळीने आवाज
पिंपरी चिंचवड

CHINCHWAD : नद्यांच्या संवर्धनासाठी आणि नदीकाठ विकास प्रकल्पाविरोधात पिंपरी-चिंचवडकरांचा मानवी साखळीने आवाज

२०० हून अधिक नागरिकांचे नैसर्गिक नदीकिनाऱ्यांसाठी एकजूट पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्यांच्या रक्षणासाठी घेतला पुढाकार चिंचवड, ९ मार्च २०२५ – आज चिंचवड येथील चाफेकर चौकात २०० हून अधिक नागरिकांनी मानवी साखळी तयार करून, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) नदीकाठ विकास (RFD) प्रकल्पाचा विरोध केला आणि स्थानिक नद्यांच्या शुद्धीकरणासाठी त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली. नागरिकांनी नदी प्रदूषण रोखणे, १००% सांडपाणी प्रक्रिया सुनिश्चित करणे आणि कोणत्याही प्रकारचे बांधकाम न करता नैसर्गिक नदीकिनारे जपण्याची गरज अधोरेखित केली. या आंदोलनात अनेक स्थानिक स्वयंसेवी संस्था, पर्यावरण संघटना आणि सामाजिक प्रतिष्ठानांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवला. सकाळी ८ वाजता चाफेकर चौकात जमलेल्या नागरिकांनी पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्यांच्या आरोग्य व भविष्यासाठी चिंत...
CHINCHWAD : थेरगाव बटरफ्लाय ब्रिज गैरव्यवहाराची सखोल चौकशी करा – आमदार जगताप
पिंपरी चिंचवड

CHINCHWAD : थेरगाव बटरफ्लाय ब्रिज गैरव्यवहाराची सखोल चौकशी करा – आमदार जगताप

सात वर्षे रखडलेल्या पुलाच्या कामाकडे वेधले सरकारचे लक्ष मुंबई, ८ मार्च : चिंचवड-थेरगाव दरम्यानच्या बटरफ्लाय ब्रिजच्या कामातील कथित गैरव्यवहारावर आमदार शंकर जगताप (MLA Shankar Jagtap) यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. सदर पुलाच्या कामात मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप करत त्यांनी संबंधित ठेकेदार, सल्लागार आणि (PCMC) महानगरपालिका अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. २०१७ मध्ये २८.७१ कोटींच्या निविदेने कामाला सुरुवात थेरगाव (Thergaon) येथील प्रसून धाम हाउसिंग सोसायटीजवळून चिंचवड-थेरगाव जोडणाऱ्या बटरफ्लाय ब्रिजच्या कामासाठी २०१७ साली धनेश्वर कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराला २८ कोटी ७१ लाख रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली. विशेष म्हणजे ही निविदा मूळ अंदाजपत्रकाच्या १४ टक्के अधिक दराने मंजूर करण्यात आली होती. वेळेवर काम न झाल्याने दोनदा मुदतवाढ मूळ...
PIMPRI : शिवसेनेतर्फे काळेवाडीत महिला आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार
पिंपरी चिंचवड

PIMPRI : शिवसेनेतर्फे काळेवाडीत महिला आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार

पिंपरी, दि. 8 (प्रतिनिधी) - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रहाटणी काळेवाडी विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महापालिकेच्या महिला आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उन्हापासून संरक्षण करण्यासाठी महिलांना दुपट्टा वाटप करण्यात आला. त्यावळी योग गुरु सुरेश विटकर, सुजाता हरेश नखाते, तसलीम शेख, दत्तात्रय भट, एकनाथ मंजाळ, एकनाथ काटे, लक्ष्मण टोणपे, शंकर जाधव, आरोग्य अधिकारी आत्माराम फडतरे, कृष्णा येळवे, बाळासाहेब येडे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभाग प्रमुख गोरख पाटील यांनी केले. तर आभार चंद्रकांत गायकवाड यांनी मानले....

Actions

Selected media actions