पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत मोरया पुरस्काराचे परीक्षण
मूलभूत निकष पूर्ण करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना करण्यात येते सन्मानित
पिंपरी (लोकमराठी न्यूज नेटवर्क) - पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून गेल्या वर्षीपासून विशिष्ट नियमांच्या अधिन राहून मूलभूत निकष पूर्ण करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना मोरया पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्कारासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी, सहाय्यक पोलीस आयुक्त मुकुटराव पाटील व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयुक्तालयाच्या हद्दीतील विविध गणेश मंडळांची परीक्षणे करण्यात आली.
गणेशोत्सव साजरा करत असताना मंडळांनी आवश्यक परवानग्या सामाजिक बांधिलकी म्हणून समाजाला नाविन्यपूर्ण संदेश देणारे उपक्रम डीजे ऐवजी परंपरागत वाद्यांचा वापर विसर्जन मिरवणुकीसाठी घालून दिलेल्या नियमांचे पालन केले आहे का? तसेच वैशिष्ट्यपूर्ण जन...