पिंपरी चिंचवड

काळेवाडी गावठाण महापालिका शाळेत कोविड-१९ लसीकरण केंद्रे सुरू
पिंपरी चिंचवड, आरोग्य

काळेवाडी गावठाण महापालिका शाळेत कोविड-१९ लसीकरण केंद्रे सुरू

नगरसेविका निता पाडाळे यांच्या पाठपुराव्याला यश पिंपरी : नागरिकांना सोईस्कर होईल याकरिता काळेवाडीत कोविड-१९ लसीकरण केंद्र आवश्यक होते. यासाठी नगरसेविका निता पाडाळे यांचा महापालिकेकडे सतत पाठपुरावा सुरू होता. या पाठपुराव्याला अखेर यश आले असून महापालिकेच्या वतीने काळेवाडी गावठाण येथे महापालिकेच्या शाळेत कोविड-१९ लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आले आहे. काळेवाडीतील या लसीकरण केद्रांत १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण होणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी कोविड-१९ लसीकरण करावे. जेणेकरून कोरोना या महामारीपासून आपले संरक्षण होईल. असे आवाहन नगरसेविका निता पाडाळे यांनी केले आहे. याबाबत नगरसेविका पाडाळे म्हणाल्या, काळेवाडीतील अनेक वयोवृद्ध नागरिक व महिला यांना इतर ठिकाणी लसीकरणासाठी जाण्यास अडचणी येत होत्या. त्यासाठी महापालिका आयुक्त व आरोग्य विभाग यांच्याकडे बऱ्यादा पत्रव्यवहार केला, तसेच 'ब' प...
कौतुकास्पद : वाढदिवसाचा खर्च टाळून दोन भावंडांनी कोकण पुरग्रस्तांसाठी दिली मदत
सामाजिक, पिंपरी चिंचवड

कौतुकास्पद : वाढदिवसाचा खर्च टाळून दोन भावंडांनी कोकण पुरग्रस्तांसाठी दिली मदत

सामाजिक कार्यकर्ते शशिकांत तापकीर व विवेक तापकीर यांच्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक पिंपरी चिंचवड (लोकमराठी) : पूरपरिस्थितीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत धुमधडाक्यात वाढदिवस साजरा करणे योग्य नाही, या मानवतेच्या भावनेतून काळेवाडीमधील व्यंकटेश्वरा मित्र मंडळाचे अध्यक्ष शशिकांत राजाराम तापकीर व पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे विवेक मल्हारी तापकीर या भावंडांनी आपल्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत, तो निधी कोकण पुरग्रस्तांसाठी मदत म्हणून दिला. माजी नगरसेवक प्रमोद ताम्हणकर यांच्या सहकार्याने पवना हेल्थ क्लबचे सदस्य महेश पवार, मंगेश कदम यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत तापकीर यांच्या हस्ते मदतनिधी सुपुर्त करण्यात आला. यावेळी ओम साई ग्रुपचे अध्यक्ष सोमनाथ तापकीर , डाॅ. अजय जाधव, मनोज शिंदे, नगरसेवक बाबा त्रिभुवन, नरेश खुळे, दिपक पंचबुध्दे, रामदास कर्वे, ...
भिशीचे कोट्यवधी रुपये घेऊन पसार झालेल्या सातपुते कुटुंबावर गुन्हा दाखल करा
पिंपरी चिंचवड

भिशीचे कोट्यवधी रुपये घेऊन पसार झालेल्या सातपुते कुटुंबावर गुन्हा दाखल करा

शिवसेना विभाग संघटीका भाग्यश्री म्हस्के यांची पोलिसांकडे मागणी पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील रहाटणी परिसरात राहणाऱ्या सातपुते कुटुंबाने सुमारे १०० पेक्षा जास्त लोकांचे भिशीचे कोट्यावधी रुपये घेऊन पोबारा केला आहे. या फसवणुकीच्या प्रकाराबाबत वाकड पोलीस ठाण्यात अनेक तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी चिंचवड मतदार संघाच्या शिवसेना विभाग संघटीका व पोलीस मित्र संघटनेच्या शहर उपाध्यक्षा भाग्यश्री म्हस्के यांनी पोलिसांना निवेदन दिले असून लवकरात लवकर आरोपींचा शोध घेण्याची मागणी केली आहे. गुंतवणूकदारांनी दिलेल्या माहितीनुसार, रहाटणी परिसरात राहणाऱ्या सातपुते कुटुंबाने नागरिकांनी विश्वासाने लावलेल्या भिशीचे पैसे स्वतःकडे ठेवले. त्या पैशांची स्वतः गुंतवणूक करून गुंतवलेले पैसे मिळत नसल्याचा बहाणा करून भिशी घेणारा व्यक्ती परशुराम सातपुते, त्याची पत्नी पुष्पा सातपुते, मुलगा सा...
मंत्री धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांगासाठी मोफत उद्योग आधार व शॉप अॅक्ट लायसेन्स | दोन तरूणांचा उपक्रम
पिंपरी चिंचवड

मंत्री धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांगासाठी मोफत उद्योग आधार व शॉप अॅक्ट लायसेन्स | दोन तरूणांचा उपक्रम

करण जायभाये | विजय वडमारे |सचिन बडे पिंपरी चिंचवड : महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत उद्योग आधार व व्यवसाय परवाना (शॉप अॅक्ट लायसेन्स) काढून देण्याचा अभिनव उपक्रम श्री. धनंजय मुंडे युवा मंचच्या माध्यमातून दोन तरूणांनी राबवला. पाच दिवस राबविलेल्या या शिबिरात ३०५ जणांनी लाभ घेतला. मंत्री धनंजय मुंडे यांचे स्विय सहाय्यक करण जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली विजय नामदेव वडमारे व सचिन बडे या दोन तरूणांनी हा उपक्रम राबवला. फळे, भाजीपाला विक्री, किराणा, चप्पल विक्री अशा विविध व्यावसायासाठी महाराष्ट्रातील अनेक भागातील दिव्यांगांनी या उपक्रमाचा फायदा घेतला. असे विजय वडमारे यांनी सांगितले. दरम्यान, मागील वर्षी शहरात वास्तव्यास असलेल्या बीड जिल्ह्यातील 40 नागरिकांना ही प्रमाणपत्रे काढून दिली असून ना...
काळेवाडीत रस्त्यांमधील विद्युत डीपी बॉक्सचा वाहतुकीस अडथळा
पिंपरी चिंचवड

काळेवाडीत रस्त्यांमधील विद्युत डीपी बॉक्सचा वाहतुकीस अडथळा

लोकमराठी न्यूज नेटवर्क काळेवाडी : प्रभाग क्रमांक २२ मधील विजय नगर भागात अनेक विद्युत डीपी बॉक्स रस्त्यांमध्ये बसविलेले आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून अनेकदा अपघातही झाले आहेत. असे रहदारीला त्रासदायक ठरणारे डीपी बॉक्स रस्त्यांच्या बाजूला बसवावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख इरफान अब्दुलराहिम यांनी केली आहे. महावितरणच्या वतीने बसविला जाणारे विद्युत डब्बे रस्त्याच्या कडेला बसविणे अवश्यक होते. परंतु, ते साधारण तीन फूट रस्त्यांमध्ये बसविले आहेत. या ठिकाणी राहणार्‍या करदात्यांना असे नियम बाह्य बसविलेल्या डब्यांमुळे अडचण होत आहे. वाहन चालवताना वळणावर जपून चालवावे लागते, कारण या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता जास्त असते. मागील पाच वर्षात कोणीही या प्रकरणात लक्ष घातले नाही. असे शेख यांनी सांगितले. https://www.amazon.in/gp/product/B00F38B3NW/ref=as_li_...
रॉयल फाउंडेशनतर्फे नचिकेत बालग्राममध्ये अन्नधान्य, खाऊ व हाऊसकिपींग किटचे वाटप
पिंपरी चिंचवड, सामाजिक

रॉयल फाउंडेशनतर्फे नचिकेत बालग्राममध्ये अन्नधान्य, खाऊ व हाऊसकिपींग किटचे वाटप

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रविभाऊ नांगरे लोकमराठी न्यूज नेटवर्क काळेवाडी : जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेचा सर्वात जास्त धोका बालकांना असल्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर रॉयल फाउंडेशनच्या प्रयत्नातून रविभाऊ नांगरे यांच्या वतीने आकुर्डी येथील नचिकेत बालग्राम येथे शालेय साहित्य, मास्क तसेच अन्नधान्य, खाऊ व हाऊसकिपींग किटचे वाटप करण्यात आले. त्यावेळी रॉयल फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष रविभाऊ नांगरे यांनी मुलांना कोरोना विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी प्रतिबंधक नियमांची माहिती दिली, तसेच करिअरबाबत महत्त्वाचे मार्गदर्शन केले. रविभाऊ नांगरे म्हणाले की, "पाच ते दहा या वयोगटातील मुलं कोणतीही कला चांगल्या प्रकारे व लवकर शिकू शकतात. त्यामुळे रॉयल फाउंडेशनच्या माध्यमातून बालग्राममधील मुलांना संगिताचे धडे दिले जाणार आहेत. त्यासाठी दोन त...
महापौरांच्या आश्वासनानंतर अपना वतन संघटनेचे ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित
पिंपरी चिंचवड

महापौरांच्या आश्वासनानंतर अपना वतन संघटनेचे ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित

पिंपरी चिंचवड : शहरामध्ये १ जुलैपासून लादलेल्या पे अँड पार्किंग धोरणाला शहरातून मोठ्या प्रमाणात विरोध होत असून या धोरणामुळे सामान्य जनतेची व कामगारांची आर्थिक पिळवणूक होत आहे. त्यामुळे अपना वतन संघटनेच्या वतीने पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील, महापौर माई ढोरे , आमदार लक्ष्मण जगताप, भाजप शहराध्यक्ष व भोसरी मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांना निवेदन दिले होते. परंतु आज आठवडा उलटून देखील पे अँड पार्किंग धोरण रद्द करण्यासंदर्भात कसल्याही हालचाली होत नसल्याने अपना वतन संघटनेच्या वतीने आक्रमक पवित्रा घेत हे धोरण कुणाच्या हितासाठी रेटून नेण्यात येत आहे? असा सवाल करीत आज शनिवार दिनांक २४ जुलै २०२१ रोजी महापौर कार्यालय येथे आंदोलन करण्यात येणार होते. परंतु महापौर यांनी आंदोलन कर्त्यांची भेट घेतली. त्यावेळी झालेल्या बैठकीत अपना वतन संघटनेच्या वतीने पे अँड पार्क धोरण रद्द करून स...
‘पीएमपी मी- कार्ड’ नवीन रजिस्ट्रेशनला मुदतवाढ द्या!
पिंपरी चिंचवड

‘पीएमपी मी- कार्ड’ नवीन रजिस्ट्रेशनला मुदतवाढ द्या!

भाजपा वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक मोढवे-पाटील यांचा इशारा ‘पीएमपीएमएल’चे संचालक राजेश पाटील यांना मागणीचे निवेदन पिंपरी : पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) प्रशासनाच्या वतीने ‘मी-कार्ड’ ही सुविधा सुरू केली आहे. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे पीएमपीच्या प्रवाशांना कार्ड बदलून घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. दि.१९ ते २६ जुलै २०२१ पर्यंत मी- कार्डसाठी नव्याने नोंदणी करण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांच्या दृष्टीने ‘मी-कार्ड’ नवीन नोंदणीसाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी भाजपा वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक मोढवे-पाटील यांनी केली आहे. याबाबत ‘पीएमपीएमएल’चे संचालक आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवडमध्ये कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. ‘मी-कार्ड’ पुन: नोंदणीसाठी दिलेला कालावधी...
पिंपरी चिंचवड भाजपाचे ‘मिशन १००+’; शहराध्यक्ष महेश लांडगेंनी ‘शड्डू ठोकला’
पिंपरी चिंचवड, राजकारण

पिंपरी चिंचवड भाजपाचे ‘मिशन १००+’; शहराध्यक्ष महेश लांडगेंनी ‘शड्डू ठोकला’

शहरात 'बूथ सक्षमीकरण' अभियान; कार्यकर्त्यांच्या 'डोअर टू डोअर' भेटी-गाठी! मोहननगरमधील भाजपाच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांशी साधला संवाद पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये शहर भाजपाकडून मोर्चेबांधणीला सुरवात झाली असून, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'मिशन १००+' हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे मैदानात उतरले असून, निवडणुकीच्या तयारीचा 'शड्डू ठोकला' आहे. शहर भाजपातर्फे शनिवारपासून (दि.१७) पक्षाच्या 'बुथ सक्षमीकरण' अभियानाला सुरवात करण्यात आली. मोहननगर येथील प्रभाग क्रमांक १४ पासून स्वतः भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्यासह अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी जुने-जाणते कार्यकर्ते तसेच बूथ प्रमुखांच्या 'डोअर टू डोअर' भेटीगाठी घेऊन चर्चा केली. शहर भाजपाचा हा 'बूथ सक्षमीकरण' पॅटर्न कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढविण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. प्...
संभाजी ब्रिगेडच्या वतीने साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतीदिन साजरा
पिंपरी चिंचवड

संभाजी ब्रिगेडच्या वतीने साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतीदिन साजरा

पिंपरी चिंचवड : साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतीदिन संभाजी ब्रिगेडच्या वतीने थेरगाव येथील कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा संघटक संतोष बनगर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या बद्दल विचार मांडताना पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतिश काळे म्हणाले की, पृथ्वी हि शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून कष्टकर्यांच्या व श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे. असं ठनकावत मनामनात क्रांतीची ठिणगी पेटवणारे थोर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांनी तेरा लोकनाट्य, तीन नाटके, चौदा कथासंग्रह, पस्तीस कादंबर्यां, एक शाहिरी ग्रंथ, पंधरा पोवाडे, एक प्रवास वर्णन, सात चित्रपट कथा, माझा रशियाचा प्रवास हे प्रवास वर्णन असे विविध साहित्य लिहिणारे लेखक अण्णाभाऊ साठे यांनी रशियाच्या चौकाचौकात छत्रपती शिवरायांची किर्ती पो...