पुणे

एस.एम. जोशी कॉलेजच्या विद्यार्थीनींचे वर्ल्ड रेकॉर्डस समूह नृत्य गायनात यश
पुणे, क्रीडा

एस.एम. जोशी कॉलेजच्या विद्यार्थीनींचे वर्ल्ड रेकॉर्डस समूह नृत्य गायनात यश

पुणे : एस.एम. जोशी कॉलेजमधील दिलशाद मुलाणी व गंगासागर भाकड या विद्यार्थिनींनी, मार्गम नृत्य अकादमी मार्फत आयोजित केलेल्या वर्ल्ड रेकॉर्डस समूह नृत्य गायनामध्ये सहभाग घेवून विविध प्रकारचे नृत्य सादर केले. त्याबद्दल त्यांना मॉर्गन नृत्य अकादमी मार्फत मेडल व प्रशस्तीपत्रक देवून गौरविण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्रचार्य डॉ. एन.एस. गायकवाड साहेब यांनी त्यांचे कौतुक करीत, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचा शैक्षणिक क्षेत्राबरोबरच, कला व क्रीडा क्षेत्रात चांगला नावलौकिक व्हावा यासाठी महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना सातत्याने प्रोत्साहन देण्याचे कार्य करीत आहे. विद्यार्थ्याच्या या यशात महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाला मोलाचा वाटा असून, विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी सांस्कृतिक विभागाचे चेअरमन डॉ. शिल्पा शितोळे, डॉ. अ...
स्वारगेट पोलीस वसाहतीचे कचरा डेपोत रूपांतर : पोलीस कर्मचारी व कुटुंबियांचे आरोग्य धोक्यात 
पुणे, मोठी बातमी

स्वारगेट पोलीस वसाहतीचे कचरा डेपोत रूपांतर : पोलीस कर्मचारी व कुटुंबियांचे आरोग्य धोक्यात

पुणे शहर कचरा पेटी (कंटेनर) मुक्त तर पोलीस वसाहतीत कचरा व पेट्यांचा खच पुणे, ता. १४ सप्टेंबर २०२२ : पुणे महापालिकेकडून पुणे शहर कचरा पेटी मुक्त करण्याच्या प्रयत्नात स्वारगेट पोलीस वसाहतीचे कचरा डेपोमध्ये रूपांतर केल्याचे दिसून येत आहे. पुणे महापालिकेचे कर्मचारी या ठिकाणी कचऱ्याचा साठा करताना दिसत आहेत. स्वारगेट परिसरातील हॉटेल, भाजी मंडई येथील सडलेला कचरा या ठिकाणी आणून ठेवला जात असून मोठ्या प्रमाणात साठा केला जात आहे. हा कचरा गोळा करण्यासाठी तसेच त्याची व्हिलेवाट लावण्यासाठी पुणे महापालिका कर्मचारी पैसे देखील घेत असल्याचे दिसून येत आहेत. हे पैसे घेऊन हा कचरा पोलीस वसाहतीत टाकला जात आहे. दोन ते चार दिवस या पेट्या (कंटेनर) उचल्या जात देखील नाहीत त्यामुळे कॉलनीतील पोलीस कुटुंबियांचे आरोग्य धोक्यात आले आहे तसेच डेंगू, मलेरिया व साथीच्या रोगांनी कर्मचारी व कुटुंबीय त्रस्त झाले असून ...
समाजाची उंची शिक्षकांच्या गुणवत्तेवर अवलंबून – प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड 
पुणे, शैक्षणिक

समाजाची उंची शिक्षकांच्या गुणवत्तेवर अवलंबून – प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड

हडपसर, ता. ५ सप्टेंबर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेजमध्ये डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिनाचे आयोजन सांस्कृतिक विभाग व स्टाफ वेल्फेअर समितीमार्फत करण्यात आले होते. यावेळी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आले. तसेच शिक्षक दिनाच्या निमित्ताने कॉलेजमधील सर्व प्राध्यापक व प्रशासकीय सेवक यांना गुलाब पुष्प व पेन देवून सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन. एस. गायकवाड साहेब म्हणाले की, प्राचीन काळापासून गुरूंबद्दलचा आदर व्यक्त केला जातो. एकोणिसाव्या शतकात भारतीय शाळा सुरू करणारे महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी व बहुजन समाजासाठी शिक्षणाची व्यवस्था सुरू केली. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी घोलप नावाच्या विद्यार्थ्याला बरोबर घेवून आशिया खंडातील सर्वात मोठ्या ...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये आविष्कार संशोधन कार्यशाळा संपन्न 
पुणे

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये आविष्कार संशोधन कार्यशाळा संपन्न

हडपसर, ता. ३ सप्टेंबर (प्रतिनिधी) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यार्थी व शिक्षकांमध्ये संशोधन संस्कृती रुजवण्यासाठी आविष्कार संशोधन स्पर्धेचे आयोजन करून नाविन्यपूर्ण आणि अभिनव विचारांना प्रोत्साहन दिले आहे. तसेच शैक्षणिक प्रतिभेच्या अभिव्यक्तीची संधी देवून शैक्षणिक क्षेत्रातील परस्परसंवादाला प्रोत्साहन दिले आहे. हा उपक्रम वैशिष्ट्यपूर्ण असून त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये खूप उत्साह निर्माण झाला आहे. दोन वर्षानंतर हा उपक्रम विविध महाविद्यालयांमध्ये राबवला जात आहे. रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेजमधील रिसर्च सेल (RAPC), आय.क्यू.ए.सी. सेल आणि स्टुडन्ट टीचर असोसिएशन सेल यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी आविष्कार संशोधन स्पर्धेवर आधारीत कार्यशाळा घेण्यात आली. डॉ. रंजना जाधव, शैक्षणिक संशोधन समन्वयक, स्टुडन्ट टीचर असोसिएशन सेलचे चेअरमन यांनी क...
भाजपचा दुटप्पीपणा : पुणे महापालिकेच्या निवडणुकीचे काय होणार? – आप राज्य संघटक विजय कुंभार
राजकारण, पुणे

भाजपचा दुटप्पीपणा : पुणे महापालिकेच्या निवडणुकीचे काय होणार? – आप राज्य संघटक विजय कुंभार

पुणे : शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्येचा विचार करता पुण्याचे विभाजन करून दोन महापालिकांची आवश्यकता आहे, अशी भूमिका राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडली. दिल्लीमध्ये मात्र, तीन महापालिकांचे विलीनीकरण करून एकच महापालिका करण्यात आली आहे. त्यासाठीही भारतीय जनता पक्षच आग्रही होता. प्रशासकीय सोयीसाठी सत्तेचे विकेंद्रीकरण आवश्यक असते. मात्र त्यासाठी एकच काहीतरी भूमिका असली पाहिजे. इथं मात्र पक्षाच्या सोयीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी भूमिका मांडली जात आहे. यात जनतेचे हित प्रशासनाची सोयकुठेही दिसत नाही, तर काहीही करून सत्ता मिळवण्यासाठी सर्व चांगल्या गोष्टींची मोडतोड करायची हे धोरण दिसते. त्यातूनच वार्डांची संख्या बदलणं, वॉर्ड रचना बदलणे अशा गोष्टी केल्या जातात. दिल्लीत महापालिकांचे विलीनीकरण करण्याच्या नावाखाली निवडणूक प्रलंबित ठेवण्यात आली आहे....
समाजोपयोगी संशोधन करावे – डॉ. एन. एस. गायकवाड
पुणे, शैक्षणिक

समाजोपयोगी संशोधन करावे – डॉ. एन. एस. गायकवाड

हडपसर, ता. १ सप्टेंबर (प्रतिनिधी) : संशोधन ही अविरतपणे चालणारी प्रक्रिया आहे. आपल्या हातून समाजोपयोगी संशोधन घडायला हवे. आपण लोकांच्या कल्याणासाठी संशोधन करावे. जर आपण गुणवत्तापूर्ण संशोधन केले तर त्याची दखल जागतिक स्तरावर घेतली जाते. महात्मा जोतीराव फुले, संत ज्ञानेश्वर यांनी मराठी साहित्याला दिलेले योगदान आजही उपयुक्त आहे. मार्गदर्शकाने स्वतःची गुणवत्ता राखून आपले श्रेष्ठत्व सिद्ध करायला पाहिजे. असे विचार प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व मराठी संशोधन केंद्राच्यावतीने आयोजित मराठी पीएच.डी. सिनोप्सेस सादरीकरणाच्या कार्यक्रमात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. याप्रसंगी डॉ. राजेंद्र थोरात, डॉ. नानासाहेब पवार, डॉ. अरुण कोळेकर, मराठी विभागप्रमुख डॉ. राजेंद्र ठाकरे तज्ञ व्यक्ती म्हणून उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. नम्रता म...
एस. एम. जोशी कॉलेज हडपसर येथे प्राचार्यपदी डॉ. एन. एस. गायकवाड
पुणे

एस. एम. जोशी कॉलेज हडपसर येथे प्राचार्यपदी डॉ. एन. एस. गायकवाड

पुणे (प्रतिनिधी) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील नामांकित एस. एम. जोशी कॉलेज हडपसर, पुणे येथे डॉ. एन. एस. गायकवाड प्राचार्य म्हणून रुजू झाले आहेत. ते रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य, पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य, तसेच ‘रयत इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अँड डेव्हलपमेंट’ साताराचे ते संचालकही होते. ते रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य आहेत. भारतीय भौतिकशास्त्र संघटनेचे ते आजीवन सदस्य आहेत. संशोधनासाठी युरोपियन युनियनची पोस्ट डॉक्टरेटसाठी फेलोशिप त्यांना प्राप्त झाली होती. त्याआधारे त्यांनी ‘नॕशनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्च बेल्व्हू पॕरिस’ येथे सव्वा वर्ष संशोधन केले आहे. त्यांनी महाविद्यालयासाठी ‘गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली’ स्थापन केली. ज्यामध्ये वैयक्तिक शिक्षकांच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जाते. नॕक (NAAC) ...
एस. एम. जोशी कॉलेजला शौर्य पदक विजेते कर्नल राहुल शर्मा यांची सदिच्छा भेट
पुणे

एस. एम. जोशी कॉलेजला शौर्य पदक विजेते कर्नल राहुल शर्मा यांची सदिच्छा भेट

हडपसर, ता. २८ (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी या नामांकित कॉलेजला शौर्य पदक विजेते कर्नल राहुल शर्मा यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांना माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते शौर्य चक्र पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. एस. एम. जोशी कॉलेजमधील शैक्षणिक वातावरण पाहून त्यांनी याच कॉलेजमधील मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम या पदव्युत्तर वर्गात प्रवेश घेण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले. याप्रसंगी त्यांच्या समवेत कर्नल अंकुर सोरेक, लेफ्टनंट धीरज भीमवाल, आय.क़्यू.ए.सी. चे समन्वयक डॉ. किशोर काकडे, मराठी विभागप्रमुख डॉ. राजेंद्र ठाकरे, प्रा. शुभम तांगडे हे उपस्थित होते....
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध उपक्रमांनी संपन्न
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध उपक्रमांनी संपन्न

हडपसर, ता. २८ (प्रतिनिधी) : एस. एम. जोशी नामांकित कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सांस्कृतिक विभागाच्या वतीने क्रांतिकारकांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी मंडळ विभागामार्फत विद्यार्थ्यांना तिरंगा झेंड्याचे वाटप करण्यात आले. इतिहास विभागामार्फत 'इन्कलाब' हा माहितीपट दाखविण्यात आला. 'हर घर तिरंगा' या उपक्रमात महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मराठी विभागाच्या वतीने निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. 'विभाजन विभिषीका स्मृतिदिनानिमित्त' इतिहास विभागप्रमुख डॉ. दिनकर मुरकुटे यांनी मार्गदर्शन केले. स्वातंत्र्याच्या अमृत म...
पत्रमहर्षी आचार्य अत्रे पुरस्कार शीतल करदेकर यांना जाहीर
पुणे

पत्रमहर्षी आचार्य अत्रे पुरस्कार शीतल करदेकर यांना जाहीर

आचार्य अत्रे जयंतीनिमित्त हास्य-विनोद आनंद महोत्सव पुणे : आचार्य अत्रे यांच्या जयंतीनिमित्त आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठानतर्फे ‘हास्य-विनोद आनंद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. ११ ते १३ ऑगस्ट या कालावधीत शिवाजीनगर येथील लकाकी रस्त्यावरील आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठान, विनोद विद्यापीठ येथे हा महोत्सव पार पडेल, अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष ॲड. बाबूराव कानडे यांनी दिली. यावेळी प्रतिष्ठानचे विश्वस्त वसंतराव कुलकर्णी, कमलाकर बोकील, सल्लागार डॉ. आनंद देशपांडे आदी उपस्थित होते. महोत्सवाचे उद्‌घाटन गुरुवारी (ता. ११) विसुभाऊ बापट यांच्या हस्ते सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. त्यानंतर ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ हा कार्यक्रम सादर होणार आहे. १२ ऑगस्ट रोजी इंद्रधनू हा कार्यक्रम सादर होणार आहे. तर, १३ ऑगस्टला न्यायमूर्ती राजेश केतकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण समारंभाने महोत्सव...