सामाजिक

दिव्यांगासाठी मोफत उद्योग आधार व शॉप अॅक्ट लायसेन्स | धनंजय मुंडे युवा मंचच्या माध्यमातून दोन तरूणांचा उपक्रम
पिंपरी चिंचवड, सामाजिक

दिव्यांगासाठी मोफत उद्योग आधार व शॉप अॅक्ट लायसेन्स | धनंजय मुंडे युवा मंचच्या माध्यमातून दोन तरूणांचा उपक्रम

विजय वडमारे सचिन बडे लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी : शहरात वास्तव्यास असलेल्या बीड जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत उद्योग आधार व व्यवसाय परवाना (शॉप अॅक्ट लायसेन्स) काढून देण्याचा अभिनव उपक्रम श्री. धनंजय मुंडे युवा मंचच्या माध्यमातून दोन तरूणांनी राबवला आहे. मागील सहा महिन्यांत या उपक्रमाचा 40 नागरिकांनी लाभ घेतला असून नागरिकांनाकडून या तरूणांचे कौतुक केले जात आहे. विजय नामदेव वडमारे व सचिन बडे असे या दोन तरूणांची नावे आहेत. हे तरूण, व्यवसाय करू ईच्छिणाऱ्या दिव्यांग व्यक्तींच्या घरी जाऊन उद्योग आधार व शॉप अॅक्ट लायसेन्स प्रमाणपत्र मिळविण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे व अर्ज भरून घेत. तसेच ती कागदपत्रे संबंधित कार्यालयात व मिळालेले प्रमाणपत्र दिव्यांग व्यक्तींपर्यंत पोहचवण्याचे काम हे तरूण मोफत करत आहेत. बाहेर या कामासाठी एजेंट सुमारे दिड हजार ...
प्रयत्न सोशल ऑर्गनायझेशन व हैदराबाद सेल्सफोर्स तर्फे सामाजिक उपक्रम
ताज्या घडामोडी, पुणे, सामाजिक

प्रयत्न सोशल ऑर्गनायझेशन व हैदराबाद सेल्सफोर्स तर्फे सामाजिक उपक्रम

पुणे : प्रयत्न सोशल ऑर्गनायझेशन व हैदराबाद सेल्सफोर्स स्वयंसेवकांनी सीएसआर अंतर्गत बाल शिक्षण विषयावर कार्यशाळा व शालेय साहित्य वाटप हा उपक्रम मावळ तालुक्‍यातील शिक्षणग्राम व आभाळमाया वसतिगृहात राबविण्यात आला. समाजात अनेक व्यक्ती दैनंदिन वस्तूंसाठी वंचित असतात. त्यांच्या जीवनात देखील आनंदाचे काही क्षण यावे म्हणून सेल्सफोर्स कंपनीच्या सुमारे 28 स्वयंसेवकांनी प्रयत्न सोशल ऑर्गनायझेशन सोबत संयुक्तपणे सीएसआर अंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबविले. मळवली येथील शिक्षणग्राम वसतिगृहातील 175 मुलांना संपूर्ण शालेय साहित्य वाटप, टोपी व खाऊ वाटप करण्यात आले. तसेच यावेळी बाल शोषण विषयावर कार्यशाळाही घेण्यात आली. त्यामध्ये मुलांना बाल शोषणापासून कशाप्रकारे बचाव करावा, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मावळ तालुक्‍यातील पाचाने येथे आभाळमाया आश्रयस्थानातील 25 मुलींना संपूर्ण शालेय व संस...