सामाजिक

लग्नाचा खर्च टाळून कोरोना संरक्षणासाठी केले होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप
पुणे, सामाजिक

लग्नाचा खर्च टाळून कोरोना संरक्षणासाठी केले होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप

पुणे : लग्न म्हटलं की थाटमाट आलाच. मात्र, एका तरूणाने अनावश्यक खर्चाला फाटा देत, नागरिकांचे कोरोनापासून संरक्षण होण्यासाठी व प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी Arsenic Album 30 या होमिओपॅथिक गोळ्यांचे मोफत वाटप केले. सचिन बडे असे या तरूणाचे नाव आहे. बीड जिल्ह्यातील आपल्या मुळ गावी ज्ञानोबा चोले यांची मुलगी राजकन्या हीच्याशी नुकताच त्याचा विवाह झाला. या विवाहाला मुला -मुलीकडील मोजकेच नातेवाईक उपस्थित झाले होते. कोरोना या महामारीमुळे संपुर्ण देश ठप्प झाला आहे. कोरोना विषाणूपासून संरक्षण होण्यासाठी प्रतिकारशक्ती हा महत्त्वाचा घटक मानला जात आहे. त्याच अनुशंगाने आयुष मंत्रालयाने आर्सेनिक हे होमिओपॅथिक औषध प्रतिकारशक्तीसाठी सुचवले आहे. आपणही समाजाचे देणे लागतो, या भावनेने बडे यांनी श्री धनंजय मुंडे युवा मंचच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरामधील सुमारे पाचशे गरजू नागरिकांना...
उद्योजक राहुल शिंदे मित्र परिवारातर्फे पोलिसांना 50,000 आर्सेनिक गोळ्यांचे वाटप
पिंपरी चिंचवड, सामाजिक

उद्योजक राहुल शिंदे मित्र परिवारातर्फे पोलिसांना 50,000 आर्सेनिक गोळ्यांचे वाटप

पिंपरी : कोरोना जीवघेण्या आजारापासून बचाव करण्यासाठी व आपली प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उद्योजक राहुल शिंदे मित्र परिवार आणि टायगर ग्रुप पिंपरी चिंचवड यांच्या वतीने संपुर्ण पिंपरी चिंचवड परिसरातील तसेच पुण्यातील काही पोलीस स्टेशन आणि पोलीस चौकीमध्ये आयुष्य मंत्रालयांनी सुचवलेल्या आर्सेनिक होमिओपॅथीक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. सध्या सर्वात जास्त पोलीस हे कोरोना पॉझिटिव्ह निघत आहेत, त्यांची प्रतिकार शक्ती वाढावी यासाठी हे वाटप करण्यात आले. यावेळी राहुल शिंदे, रेखा साळी, मंगेश पाटील, किरण तरंगे, आणि मित्र परिवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी
पुणे, सामाजिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी

औंध : रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांच्या मार्गदर्शनाने महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास मंडळातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी कोरोना या साथीच्या रोगाचा सामना करीत आहेत. प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी लॉक डाऊनचे पालन करीत, गरीब आणि गरजू कामगार वर्गाला तोंडाला बांधण्याचा मास आणि जीवनावश्यक अन्नधान्याच्या कीटचे वाटप केले. तसेच कोवीड १९ या साथीच्या रोगासंदर्भात समाजात जनजागृतीचे कामही केले. कोरोना या साथीच्या रोगाची लक्षणे कोणती?, कोरोना या रोगाची साखळी तोडण्यासाठी सोशल डिस्टन्स राखणे, वैयक्तीक स्वच्छता राखण्यासाठी वारंवार साबनाने किंवा सॅनिटायझरने हात स्वच्छ धुने. वस्तू व सामानाची स्वच्छता राखण्यासाठी सॅनिटायझरचा वापर करणे...
महेश प्रोफेशनल फोरमची वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना माधुकरी
पिंपरी चिंचवड, सामाजिक

महेश प्रोफेशनल फोरमची वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना माधुकरी

पिंपरी : महेश प्रोफेशनल फोरम त्यांच्या 'जॉय ऑफ लाइफ, या योजनेअंतर्गत गेले कित्येक वर्ष गरजवंतांना मदतीचा हात देत आहे. वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना माधुकरी मागण्यांमध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत. ही गोष्ट महेश प्रोफेशनल फोरमपर्यंत पोहोचली आणि वारकरी रूपात असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांची सेवा करण्याचा योग साधण्यात आला. श्री क्षेत्र आळंदी येथील विठ्ठल महाराज देशमुख धर्मशाळा, ज्ञानेश्वरी वारकरी धर्मशाळा, आणि मुंबई डबेवाले धर्मशाळा येथील वारकरी विद्यार्थ्यांना माधुकरी गहू, तांदूळ, डाळ, पोहे आणि तेल या रूपांमध्ये देण्यात आली. वारकरी शिक्षण संस्थेमधील विद्यार्थ्यांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल महेश प्रोफेशनल फोरमने वारकरी विद्यार्थ्यांचे आभार मानले. "खरा देणारा निसर्ग असतो आपण फक्त मध्यस्थी असतो म्हणून सर्वांनी निसर्गाचे उपकृत व्हावे आणि एक झाड लावून ...
Lockdown : माकडांची उपासमार टाळण्यासाठी मराठवाडा जनविकास संघाने उचलला माकडांच्या खाद्याचा भार
सामाजिक, महाराष्ट्र

Lockdown : माकडांची उपासमार टाळण्यासाठी मराठवाडा जनविकास संघाने उचलला माकडांच्या खाद्याचा भार

उस्मानाबाद : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य माणसाप्रमाणे मुक्या प्राण्यांनाही झळ पोहचत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील (परांडा) सोनारी येथे माकडांचे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य आहे. येथील कालभैरवनाथ मंदिर सुरक्षिततेसाठी भाविकांसाठी बंद असल्याने माकडांना खायला मिळणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे या वन्यप्राण्यांना पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघ व सोनारी ग्रामस्थांच्या वतीने खाद्य पुरविण्यात सुविधा केली आहे. या सुविधेचा शुभारंभ मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, भैरवनाथ अन्नछत्र ट्रस्टचे अध्यक्ष महेश कारकर, कोषाध्यक्ष रविंद्र खुळे, सहसचिव अशोक माने, सदस्य भिमा घाडगे, डोनजे गावचे सरपंच गजेंद्र सूर्यवंशी, संतोष भोरे, बापू शिंदे, विलास शिंदे, दिनेश घोगरे, सचिन भोरे, विनायक गंगाविठ्ठल, अक्षय भोरे, अक्षय भोरे अशोक भोरे, चंद्रकांत भोरे, हन...
लेखक डी.सी. पांडे यांच्यातर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप
सामाजिक, पुणे

लेखक डी.सी. पांडे यांच्यातर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप

पुणे : कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने सर्व जनजीवन विस्कळित झाले आहे. अशा परिस्थित गोरगरिबांची उपासमार होऊ नये, यासाठी लेखक व प्राध्यापक डी. सी. पांडे सर यांनी पुढाकार घेत वाघोली व खराडी परिसरात गरजूंना अन्नधान्य वाटप केले. खराडी पोलिस ठाण्याच्या मार्फत खराडी लेबरकॅम्प व दर्गा परिसरात अन्न धान्य वाटप करण्यात आले. तसेच वाघोली पोलिस ठाण्याच्या मार्फत गरीब व गरजू नागरिकांना अन्न धान्य वाटप केले. त्यावेळी खराडी पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी तापरे व विश्वास पाटील, वाघोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक नितीन अटकरे, डी.सी.पांडे सर, डॉ. सरीता पांडे, सामाजिक कार्यकर्ते दिपक चखाले, प्रविण दिवटे व सागर गायकवाड आदी उपस्थित होते. दरम्यान, डी.सी.पांडे हे प्रसिद्ध लेखक असून त्यांच्या आयआयटी जेईई आणि एनईईटी परीक्षेसाठी 13 ...
दररोज पन्नास गोरगरिब कुटुंबांना किराणा वाटप; ३५०कुटुंबाना मदत
महाराष्ट्र, सामाजिक

दररोज पन्नास गोरगरिब कुटुंबांना किराणा वाटप; ३५०कुटुंबाना मदत

एनयुजेएमचे सदस्य नगरचे पत्रकार जितेंद्र आढाव व आधार संस्थेचे सुदाम लगड यांचे अभिनंदनीय काम लोकमराठी न्यूज नेटवर्क अहमदनगर : अहमदनगर शहर व परिसरात लॉकडाउनमुळे रोजीरोटी बंद झालेल्या शंभर कुटुंबीयांना दररोज अन्न-धान्य, किराणामाल व मोफत जेवण देण्याचे ध्येय मनाशी बाळगून दोन तरुणांनी पंधरा दिवसांपासून काही मित्रांच्या देणगीच्या सहकार्यातूंन ही मोहीम सुरु केली. आता दररोज किमान पन्नास कुटुंबापर्यंत पोहोचत आहे. त्यांना मित्र परिवाराकडून शंभर रुपयांपासून ते थेट पाच हजारांपर्यंत मदत झाली आहे. श्रीगोंदे तालुक्यातील पत्रकार नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्रचे सदस्य जितेंद्र आढाव व आधार संस्थेचे सचिव सुदाम लगड या तरुणांकडून एका कुटुंबाला १५ दिवस पुरेल एवढे अन्न-धान्य आणि किराणा अशा गरजू लोकांना दिला जात आहे. त्यासाठी त्यांना काही सामाजिक संस्थांचीही मदत मिळत आहे. या युवकांच्या म...
दिव्यांगासाठी मोफत उद्योग आधार व शॉप अॅक्ट लायसेन्स | धनंजय मुंडे युवा मंचच्या माध्यमातून दोन तरूणांचा उपक्रम
पिंपरी चिंचवड, सामाजिक

दिव्यांगासाठी मोफत उद्योग आधार व शॉप अॅक्ट लायसेन्स | धनंजय मुंडे युवा मंचच्या माध्यमातून दोन तरूणांचा उपक्रम

विजय वडमारे सचिन बडे लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी : शहरात वास्तव्यास असलेल्या बीड जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत उद्योग आधार व व्यवसाय परवाना (शॉप अॅक्ट लायसेन्स) काढून देण्याचा अभिनव उपक्रम श्री. धनंजय मुंडे युवा मंचच्या माध्यमातून दोन तरूणांनी राबवला आहे. मागील सहा महिन्यांत या उपक्रमाचा 40 नागरिकांनी लाभ घेतला असून नागरिकांनाकडून या तरूणांचे कौतुक केले जात आहे. विजय नामदेव वडमारे व सचिन बडे असे या दोन तरूणांची नावे आहेत. हे तरूण, व्यवसाय करू ईच्छिणाऱ्या दिव्यांग व्यक्तींच्या घरी जाऊन उद्योग आधार व शॉप अॅक्ट लायसेन्स प्रमाणपत्र मिळविण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे व अर्ज भरून घेत. तसेच ती कागदपत्रे संबंधित कार्यालयात व मिळालेले प्रमाणपत्र दिव्यांग व्यक्तींपर्यंत पोहचवण्याचे काम हे तरूण मोफत करत आहेत. बाहेर या कामासाठी एजेंट सुमारे दिड हज...
प्रयत्न सोशल ऑर्गनायझेशन व हैदराबाद सेल्सफोर्स तर्फे सामाजिक उपक्रम
ताज्या घडामोडी, पुणे, सामाजिक

प्रयत्न सोशल ऑर्गनायझेशन व हैदराबाद सेल्सफोर्स तर्फे सामाजिक उपक्रम

पुणे : प्रयत्न सोशल ऑर्गनायझेशन व हैदराबाद सेल्सफोर्स स्वयंसेवकांनी सीएसआर अंतर्गत बाल शिक्षण विषयावर कार्यशाळा व शालेय साहित्य वाटप हा उपक्रम मावळ तालुक्‍यातील शिक्षणग्राम व आभाळमाया वसतिगृहात राबविण्यात आला. समाजात अनेक व्यक्ती दैनंदिन वस्तूंसाठी वंचित असतात. त्यांच्या जीवनात देखील आनंदाचे काही क्षण यावे म्हणून सेल्सफोर्स कंपनीच्या सुमारे 28 स्वयंसेवकांनी प्रयत्न सोशल ऑर्गनायझेशन सोबत संयुक्तपणे सीएसआर अंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबविले. मळवली येथील शिक्षणग्राम वसतिगृहातील 175 मुलांना संपूर्ण शालेय साहित्य वाटप, टोपी व खाऊ वाटप करण्यात आले. तसेच यावेळी बाल शोषण विषयावर कार्यशाळाही घेण्यात आली. त्यामध्ये मुलांना बाल शोषणापासून कशाप्रकारे बचाव करावा, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मावळ तालुक्‍यातील पाचाने येथे आभाळमाया आश्रयस्थानातील 25 मुलींना संपूर्ण शालेय व सं...