वाईल्ड अनिमल्स अँड स्नेक प्रोटेक्शन सोसायटीमुळे मिळाले कुत्र्याच्या पिल्लांना जीवनदान


पिंपरी चिंचवड : ‘वाईल्ड अनिमल्स अँड स्नेक प्रोटेक्शन सोसायटीने तातडीने केलेला मदतीमुळे ड्रेनेज वाहिनीत पडलेल्या कुत्र्याच्या पिल्लांना जीवनदान मिळाले. ही घटना पिंपरी चिंचवड शहरात नुकतीच घडली.

इंद्रायणीनगर पॉवर हाऊस जवळ अक्षय राऊत यांना चेंबरमध्ये कुत्र्याच्या पिल्ल्यांचा आवाज येत असल्याची प्राथमिक माहिती ‘वाईल्ड अनिमल्स अँड स्नेक प्रोटेक्शन सोसायटी’ला मिळाली. घटनेची दखल घेत इतर सदस्य सुरज भारती, करण सोनवणे, मयूर सुपेकर, ओमकार भुतकर तसेच कृष्णा पांचाळ घटनास्थळी पोहचले.

रेस्क्यू दरम्यान निर्माण झालेल्या अडचणी लक्षात घेत, नागरिकांच्या वर्दळीतून मदत करणारे हात पुढे आले. रेस्क्यू जलदगतीने व्हावा, या दृष्टीतून स्वतःच्या गाडीतील जॅक व इतर सामग्री देत तीन युवक अनिकेत सुद्रीप, पुनित देव, संचित पाटील व रिक्षामालक उमेश महाले यांचे सहकार्य मोलाचे ठरले.

आठ जणांच्या मदतीने व चार तासांच्या प्रयत्नानंतर शोध कार्य पार पडले. त्यामुळे दोन गोंडस पिल्ल्यांना जीवदान मिळाले.

सदर ठिकाणी पादचारी मार्गावर कंत्राटदाराचा बेजबाबदारपणा उघड झाला. पावसाचे पाणी जाण्यासाठी बसविलेल्या ड्रेनेजच्या झाकणाला अर्धाफुट फट होती. जाळी अथवा अडथळा नसल्याने पाच ते सहा फूट खोल चेंबर मध्ये दोन पिल्लं पडली असल्याचे निदर्शनास आले त्यात एकाला जखम झालेली आहे.

दोन्हीं पिल्ल्यांना सुंदर घरे मिळाले आहे. रेस्क्यू दरम्यान सापडलेले पहिले पिल्लू रिक्षा मालक उमेश महाले यांनी तर दुसरे पिल्लू घरकुल मधील मातोश्री हौसिंग सोसायटी B-8 यांनी स्वीकारले आहे.