‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानासाठी काळेवाडीत शिवसैनिकांचे विशेष योगदान

'माझे कुटुंब माझी जबाबदारी' अभियानासाठी काळेवाडीत शिवसैनिकांचे विशेष योगदान

पिंपरी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियानाअंतर्गत पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी शिवसेना विभागाच्या वतीने संपूर्ण काळेवाडी भागांमध्ये हे अभियान राबविण्यात आले आहे.

दरम्यान, हे अभियान राबवत असताना सामान्यातल्या सामान्य कुटुंबाला व कुटुंबातील प्रत्येक सदस्याची शरीर तापमान चाचणी व ऑक्सिजन पातळी चाचणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत केली जात आहे.

काळेवाडी भागातील नागरिकांना या अभियानाचा जास्तीत जास्त व्हावा यासाठी काळेवाडीतील चिंचवड विधानसभा प्रमुख हरेशआबा नखाते, काळेवाडी शिवसेना विभाग प्रमुख गोरख पाटील, उपविभाग प्रमुख गणेश वायभट, रहाटणी विभाग प्रमुख प्रदीप दळवी, अंकुश कोळेकर, शाखाप्रमुख नरसिंग माने, उपविभाग संघटक रविकिरण घटकार, दत्ता गिरी, काळेवाडी विभाग संघटिका भाग्यश्री मस्के यांच्यासह या भागातील सर्व शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.