दिव्यांगासाठी मोफत उद्योग आधार व शॉप अॅक्ट लायसेन्स | धनंजय मुंडे युवा मंचच्या माध्यमातून दोन तरूणांचा उपक्रम
विजय वडमारे सचिन बडे
लोकमराठी न्यूज नेटवर्क
पिंपरी : शहरात वास्तव्यास असलेल्या बीड जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत उद्योग आधार व व्यवसाय परवाना (शॉप अॅक्ट लायसेन्स) काढून देण्याचा अभिनव उपक्रम श्री. धनंजय मुंडे युवा मंचच्या माध्यमातून दोन तरूणांनी राबवला आहे. मागील सहा महिन्यांत या उपक्रमाचा 40 नागरिकांनी लाभ घेतला असून नागरिकांनाकडून या तरूणांचे कौतुक केले जात आहे.
विजय नामदेव वडमारे व सचिन बडे असे या दोन तरूणांची नावे आहेत.
हे तरूण, व्यवसाय करू ईच्छिणाऱ्या दिव्यांग व्यक्तींच्या घरी जाऊन उद्योग आधार व शॉप अॅक्ट लायसेन्स प्रमाणपत्र मिळविण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे व अर्ज भरून घेत. तसेच ती कागदपत्रे संबंधित कार्यालयात व मिळालेले प्रमाणपत्र दिव्यांग व्यक्तींपर्यंत पोहचवण्याचे काम हे तरूण मोफत करत आहेत. बाहेर या कामासाठी एजेंट सुमारे दिड हजार ...