पिंपळे सौदागर येथे भाजपाच्या निवडणुकीतील यशाचा जोरदार आनंदोत्सव

पिंपळे सौदागर येथे भाजपाच्या निवडणुकीतील यशाचा जोरदार आनंदोत्सव
  • कार्यकर्त्यांनी एकत्र येत एकमेकांना भरले पेढे; शहर पुन्हा होणार भाजपमय; कार्यकर्त्यांना विश्वास

पिंपरी, ता. १३ : चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल भाजपच्या बाजूने नुकतेच लागले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. चार राज्यात पुन्हा भाजपचे मुख्यमंत्री होणार आहेत.

त्याचा आनंदोत्सव प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार घालून त्यांना वंदन करून घोषणा देत आमदार लक्ष्मण जगताप यांचा मार्गदर्शनाखाली शनिवारी (दि. १२) रोजी पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फौंडेशन शेजारील भाजपच्या कुंदा संजय भिसे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर साजरा करण्यात आला. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोर एकत्र येवून एकमेकांना पेढे वाटून अभिनंदनही केले. यावेळी भाजपच्या चिंचवड विधानसभा महिला मोर्चा अध्यक्षा कुंदा भिसे आणि मोठ्या संख्येने कायकर्ते उपस्थित होते.

देशात सर्वदूर भारतीय जनता पार्टीची सत्ता येताना दिसत आहे. नुकत्याच ५ राज्यांमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला चार ठिकाणी स्पष्ट बहुमत प्राप्त झाले आहे. राज्यात भाजपामय वातावरण होत आहे. आगामी काळातही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे आणि या ठिकाणीसुध्दा शहरातील नागरिक भाजपाचीच सत्ताधारी पक्ष म्हणून निवड करणार असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.